नेहमीप्रमाणेच
अत्यंत
दिमाखदारपणे लॉस
एंजलिस येथे पार
पडलेल्या
हॉलिवूडच्या ८७व्या
ऍकॅडमी
ऍवार्डस (ऑस्कर)
वितरण
सोहळ्यात “बर्डमन” या
चित्रपटाने
सर्वोत्कृष्ट
चित्रपटासह चार
ऑस्कर पटकावीत
बाजी मारली. “बर्डमन”मध्ये
वय होत
चाललेल्या
सुपरस्टारची
कथा
दाखविली आहे.
या
चित्रपटाला उत्कृष्ट
दिग्दर्शक, ओरिजिनल
स्क्रीन प्ले
आणि
सिनेमॅटोग्राफीसाठी
ऑस्कर मिळाला.
“बर्डमन”ला
नऊ नामांकने
होती.
‘द
थेरी ऑफ
एव्हरीथिंग’ या
चित्रपटात
ज्येष्ठ
शास्त्रज्ञ
स्टिफन हॉकिंग
यांची भूमिका
करणाऱ्या एडी
रेडमायन या
ब्रिटिश
अभिनेत्याने
उत्कृष्ट
अभिनेत्याचा
पुरस्कार मिळविला. या
स्पर्धेत
मायकल किटन, ब्रॅडली
कूपर, स्टीव्ह
कॅरेल हे तगडे
अभिनेते होते.
‘स्टील
ऍलिस’ या
चित्रपटात
अल्झायमर हा
विकार
झालेल्या
प्राध्यापिकेच्या
केलेल्या भूमिकेबद्दल
ज्युलियन मूर
हिला
सर्वोत्कृष्ट
अभिनेत्रीचा
ऑस्कर
पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट
दिग्दर्शकाचा
पुरस्कार मिळालेले
मेक्सिकोचे
अलेजॅन्द्रो
जी इनारिट्टू यांनी
त्यांच्या
देशातील
राजकीय
परिस्थितीवर
गंभीरपणे
भाष्य करत
अमेरिकेत
स्थलांतर
केलेल्यांनाही
समान वागणूक
देण्याचे
आवाहन केले.
भारताने
ऑस्करसाठी
पाठविलेल्या “लायर्स
डाइस” या
चित्रपटाला
सर्वोत्कृष्ट
विदेशी चित्रपटासाठी
नामांकन
मिळाले नाही. हा
पुरस्कार
पोलंडच्या “इडा” या
चित्रपटाला
मिळाला. याआधी
तब्बल नऊ वेळा
नामांकन
मिळूनही
पोलंडला
प्रथमच हा
पुरस्कार मिळाला
आहे.
ऑस्कर
विजेते
·
सर्वोत्कृष्ट
चित्रपट -
बर्डमॅन
·
सर्वोत्कृष्ट
दिग्दर्शक -
आलेहांद्रे
जी. इनारितो (बर्डमॅन)
·
सर्वोत्कृष्ट
अभिनेता - एडी
रेडमेन (द
थिअरी ऑफ
एव्हरीथिंग)
·
सर्वोत्कृष्ट
अभिनेत्री -
ज्युलियन मूर (स्टील
ऍलिस)
·
परदेशी
भाषांतील
सर्वोत्कृष्ट
चित्रपट - इडा
(पोलंड)
·
सर्वोत्कृष्ट
सहाय्यक
अभिनेत्री -
पॅट्रिशिया
ऍराक्वेट
(बॉयहूड)
·
परदेशी
भाषांतील
सर्वोत्कृष्ट
चित्रपट - इडा
(पोलंड)
·
सर्वोत्कृष्ट
डॉक्युमेंटरी
शॉर्ट फिल्म -
क्राईसिस
हॉटलाईन
·
सर्वोत्कृष्ट
लाईव्ह ऍक्शन
शॉर्ट फिल्म -
बॅग बाय द फोन
कॉल
·
सर्वोत्कृष्ट
वेशभूषा -
मिलेना
कॅनोनेरो (द ग्रँड
बुडापेस्ट
हॉटेल)
·
सर्वोत्कृष्ट
साउंड
एडिटिंग - ऍलन
रॉबर्ट मुरे
आणि बुब
अस्मान
(अमेरिकन
स्नायपर)
·
सर्वोत्कृष्ट
साउंड
मिक्सिंग -
क्रेग मन, बेन
विलकिन्स, आणि
थॉमस कर्ले
(व्हिपलॅश)
·
सर्वोत्कृष्ट
स्पेशल
इफेक्ट्स -
इंटर्सटेलर
·
ऍनिमेटेड
शॉर्ट फिल्म -
पॅट्रीक
ऑसब्रोन व क्रिस्टिना
रिड (फिस्ट)
·
सर्वोत्कृष्ट
ऍनिमेटेड
फिचर फिल्म -
डॉन हॅल, ख्रिस
विल्यम्स व
रॉय कोनली (बिग
हिरो ६)
·
सर्वोत्कृष्ट
प्रॉडक्शन
डिझाईन - ऍडम
स्टॉकहाऊसेन
व ऍना पिनॉक (द
ग्रँड
बुडापेस्ट
हॉटेल)
·
सर्वोत्कृष्ट
सिनेमॅटोग्राफी
- इमॅन्युएल लुबेझ्की
(बर्डमॅन)
·
सर्वोत्कृष्ट
फिल्म
एडिटिंग - टॉम
क्रॉस (व्हिपलॅश)
·
सर्वोत्कृष्ट
डॉक्युमेंटरी
फिचर - लॉरा
पॉट्रास, मॅथिल्ड
बोनीफॉय व
डर्क
विलुत्झी
(सिटीझन फोर)
·
सर्वोत्कृष्ट
ओरिजनल साँग - ग्लोरी
(सेल्मा)
·
सर्वोत्कृष्ट
ओरिजनल स्कोर
-
अलेक्झांड्रे
डेस्पलाट (द
ग्रँड
बुडापेस्ट
हॉटेल)
·
सर्वोत्कृष्ट
ओरिजनल
स्क्रिनप्ले -
बर्डमॅन
·
सर्वोत्कृष्ट
ऍडाप्टेड
स्क्रिनप्ले -
ग्रॅहम मूर (द
इमिटेशन गेम)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा