| 
·       
  १३
  फेब्रुवारी १८७९
  - सरोजिनी
  नायडू यांचा
  जन्मदिन | 
  | 
·       
  केंद्र
  सरकारने
  काढलेल्या भूमिअधिग्रहण
  कायद्याच्या
  निषेधार्थ
  देशभरातील
  विविध शेतकरी
  व सामाजिक
  संघटना
  दिल्ली येथे ‘जंतरमंतर’समोर
  २४
  फेब्रुवारी
  रोजी
  लाक्षणिक
  धरणे आंदोलन
  करणार आहेत.
  त्यात ज्येष्ठ
  समाजसेवक
  अण्णा हजारे
  सहभागी होतील. 
·       
  भूमिअधिग्रहण
  अध्यादेशातील
  तरतुदींनुसार
  एखाद्या
  प्रकल्पासाठी
  जमिनी
  घेताना
  सरकारला
  शेतकऱ्यांची
  संमती
  घ्यावी
  लागणार नाही. यापूर्वी ७० टक्के
  शेतकऱ्यांची
  संमती
  असल्याशिवाय
  सरकारला
  जमीन
  अधिग्रहित
  करता येत
  नव्हती.
  हजारे यांनी
  यापूर्वीच
  अध्यादेशास
  विरोध केला
  आहे. | 
  | 
·       
  दक्षिण
  दिल्लीतील
  वसंत विहार
  भागात
  असलेल्या
  होली चाइल्ड
  ऑक्झिलियम
  या ख्रिस्ती
  शाळेवर काही
  समाजकंटकांनी
  हल्ला करत
  तेथे तोडफोड
  केली. त्यांनी
  शाळेच्या
  प्राचार्यांच्या
  कार्यालयातही
  नासधूस केली. | 
  | 
·       
  अहमदाबादेतील
  एका
  संग्रहालयाच्या
  नावावर गोळा
  करण्यात
  आलेल्या
  पैशांचा
  अपहार केल्याप्रकरणी
  सामाजिक
  कार्यकर्त्या
  तिस्ता सेटलवाड
  यांना सर्वोच्च
  न्यायालयाने
  १९ फेब्रुवारीपर्यंत
  अटक करण्यात
  येऊ नये, असे
  निर्देश
  दिले. 
·       
  मात्र, त्यांच्यावरील
  आरोप गंभीर
  असल्याचे निरीक्षणही
  न्यायालयाने
  नोंदविले. | 
  | 
·       
  ढाका
  येथे एका
  प्रवासी
  नौकेला
  जलसमाधी
  मिळाल्याने
  दोनशे
  प्रवासी
  बुडाल्याची
  भीती व्यक्त
  होत आहे. आतापर्यंत
  दोन मृतदेह
  बचाव
  पथकाच्या
  हाती लागल्याची
  माहिती
  पोलिसांनी
  दिली.  
·       
  या
  नौकेतील
  ज्या
  प्रवाशांना
  पोहता येत
  होते ते
  किनाऱ्यावर
  पोचू शकले. ही
  नौका कुआकाटा
  येथून
  बारगुनाच्या
  दिशेने चालली
  होती.  
·       
  नौकेतील
  सर्व
  प्रवासी एका
  धार्मिक
  कार्यक्रमासाठी
  चालले होते.
  मर्यादेपेक्षा
  अधिक प्रवासी
  भरण्यात
  आल्याने ही
  नौका
  बुडाल्याचे सांगितले
  जाते. | 
  | 
·       
  अफगाण
  नागरिकाचे
  अपहरण
  केल्याप्रकरणी
  मुंबईवरील (२६/११)
  दहशतवादी
  हल्ल्याचा
  मुख्य
  सूत्रधार झाकी-उर-
  रहमान लख्वी
  याचा जामीन
  अर्ज न्यायालयाने
  फेटाळला आहे. | 
  | 
·       
  दक्षिण
  आफ्रिकेच्या
  संसदेमध्ये
  राष्ट्राध्यक्ष
  जेकब झुमा यांच्या
  महत्त्वपूर्ण
  वार्षिक
  भाषणामध्ये
  वारंवार
  अडथळा आणल्यानंतर
  निलंबित
  करण्यात
  आलेल्या
  डाव्या
  विचारसरणीच्या
  खासदारांनी
  सुरक्षा रक्षकांशीही
  संघर्ष
  करण्याचा
  प्रयत्न
  केल्याने
  मोठा गोंधळ
  झाला. 
·       
  ज्युलियस
  मलेमा हे या
  पक्षाचे
  नेतृत्व करत
  होते. | 
  | 
·       
  रिचार्जेबल
  बॅटरी तयार
  करण्यासाठी
  लागणारा
  धातूचा
  अत्यंत पातळ
  पत्रा (अल्ट्रा
  थीन मेटल शीट) तयार
  करण्याचे
  तंत्रज्ञान
  विकसित
  केल्याबद्दल
  गुरप्रीतसिंग
  या भारतीय
  वंशाच्या
  शास्त्रज्ञाला
  पाच लाख
  अमेरिकी
  डॉलरचा
  पुरस्कार मिळाला
  आहे.  
·       
  नॅशनल
  सायन्स
  फाउंडेशनतर्फे
  हा
  प्रतिष्ठेचा
  “करियर” पुरस्कार
  दिला जातो. | 
  | 
·       
  बिहारचे
  राज्यपाल
  केसरीनाथ
  त्रिपाठी यांनी विद्यमान
  मुख्यमंत्री
  जितनराम
  मांझी यांना २० फेब्रुवारी
  रोजी विधिमंडळात
  बहुमत सिद्ध
  करण्याचे
  निर्देश दिले आहेत. | 
  | 
·       
  सुदानच्या
  लष्कराने
  गेल्यावर्षी
  दोनशे पेक्षा
  अधिक महिला
  आणि मुलींवर
  बलात्कार
  केल्याची
  धक्कादायक
  घटना समोर
  आली आहे.  
·       
  ही
  घटना
  मानवतेविरुद्ध
  असल्याचे
  मानवी हक्कांसाठी
  लढणाऱ्या
  न्यूयॉर्कमधील
  ह्युमन राईटस्
  वॉच या
  संघटनेने
  म्हटले आहे. | 
  | 
·       
  भारत
  आणि अमेरिका
  या दोन
  देशांनी ‘लष्करे
  तैयबा’ (एलईटी), ‘जमात-उद-दावा’,
  ‘जैश-ए-मोहम्मद’,
  ‘हक्कानी
  नेटवर्क’, ‘अल्
  कायदा’
  यांसारख्या दहशतवादी
  संघटना आणि
  अंडरवर्ल्ड
  डॉन दाऊद
  इब्राहिम
  यांच्या आर्थिक
  केंद्रांना
  आणि निधी
  उभारणीला
  संयुक्तपणे
  लक्ष्य
  करण्याचे
  ठरवले आहे. | 
  | 
·       
  कारमध्ये
  लहान मुले
  असतील तर
  गाडी
  चालविताना
  चालकांना
  धुम्रपान
  करण्यास
  ब्रिटन
  देशात मनाई करण्यात
  आली आहे. | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा