रेल्वे अर्थसंकल्प २०१५

खालील माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
          रेल्वे बजेटला एक नवी दिशा देण्याच्या दृष्टीने तसेच रेल्वेच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं, आणखी तोटा टाळण्यासाठी एकाही नव्या गाडीची किंवा नव्या मार्गाची घोषणा न करता सुरेश प्रभूंनी रेल्वे अर्थसंकल्प मांडून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. पण, याबरोबरच प्रभूंनी केलेल्या सुविधांच्या घोषणांमुळे रेल्वे प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित, वेगवान आणि ‘हायटेक’ होण्याची आशा निर्माण झाली आहे. रेल्वेच्या प्रवासी किंवा मालभाड्यात कुठलीही वाढ न करून प्रभूंनी प्रवाशांना मोठाच दिलासा दिला आहे.
रेल्वे म्हणजे मौल्यवान राष्ट्रीय संपत्ती असून प्रवाशांच्या गरजा समजून घेणं, रेल्वेला सुरक्षित करणं, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणं आणि आधुनिक करणं हे आपलं प्रमुख लक्ष्य असल्याचं प्रभूंनी नमूद केलं आणि त्याच दृष्टीनं नवनव्या सुविधा जाहीर केल्या.
Railway Budget 2015
रेल्वे अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये
·        प्रवासी किंवा मालवाहतूक भाड्यात वाढ नाही
·        रेल्वे आरक्षण चार महिने आधी करता येणार
·        १३८ हा रेल्वे हेल्पलाइन क्रमांक, तर सुरक्षाविषयक तक्रारींसाठी १८२ क्रमांक आणि मोबाइल अॅप १ मार्चपासून सुरू होणार
·        मोबाइल चार्जिंगची सुविधा जनरल डब्यातही
·        ए आणि ए-१ दर्जाच्या ४०० स्टेशनांवर वायफाय सुविधा देणार
·        ट्रेनच्या आगमन - प्रस्थानाबाबत एसएमएस अॅलर्ट
·        मुंबईत लवकरच एसी लोकल
·        महिला सुरक्षेसाठी निर्भया निधी
·        महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
·        नऊ मार्गांवर हायस्पीड रेल्वे धावणार
·        दिल्ली-कोलकाता, दिल्ली-मुंबई या मार्गावरील रेल्वेगाड्यांचा वेग वाढविणार
·        फोनवरून रेल्वेचं जेवण मागवता येणार. १०८ रेल्वेगाड्यांमध्ये ई केटरिंगची सुविधा सुरू करणार
·        निवडक स्थानकांवर प्रवाशांना पिक-ड्रॉपची सुविधा
·        गर्दीच्या गाड्यांचे डबे २४ वरून २६ करणार
·        ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ मोहीम राबविणार
·        स्थानके आणि रेल्वेगाड्यांना कंपन्यांची नावे देऊन निधीची उभारणी
·        रेल्वेत बायोटॉयलेट उभारणार (विमानाप्रमाणेच रेल्वे गाड्यांमध्येही व्हॅक्युम टॉयलेट सुविधा देण्याचा प्रस्ताव)
·        आयआरसीटीसीची वेबसाईट अन्य भाषांमध्येही उपलब्ध होणार
·        मोठ्या स्थानकांवर लिफ्ट, सरकत्या जिन्यांची सुविधा उपलब्ध होणार
·        अपंगांसाठी व्हिलचेअरचं बुकिंग ऑनलाइन करता येणार
·        मुंबई-अहमदाबाद मार्गासाठी हायस्पीड ट्रेनचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात
·        पाच मिनिटांत विनाआरक्षण तिकीट मिळणार
·        कोकण रेल्वेवर ३ वर्षांत ५० हजारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
·        रेल्वेमध्ये नोकरीसाठी आता ऑनलाइन अर्जभरती
·        रेल्वेमध्ये विकासासाठी पीपीपी मॉडेलचा आधार (सरकार - खाजगी भागीदारी)
·        मानवविरहित फाटकांवर अलार्म बसवले जाणार - ट्रेनची टक्कर टाळण्यासाठीही अलार्मची सुविधा
·        रेल्वेचा योजना खर्च दुपटीनं वाढवणार - यंदा ५२ हजार कोटींवरून १ लाख ११ हजार कोटींवर जाणार
·        नव्या रेल्वेगाड्यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात नंतर घोषणा
·        रेल्वेच्या जमिनींवर १ हजार कोटींची गुंतवणूक करून सौरउर्जा प्रकल्प उभारणार
·        वेगानं धावणाऱ्या रेल्वे हे सरकारचं प्राधान्य; ट्रॅक दुहेरी करण्यावर भर द्यावा लागेल
·        रेल्वेच्या सद्यस्थितीवर आधारित श्वेतपत्रिका लोकसभेत सादर
·        अतुल्य भारतासाठी अतुल्य रेल्वे सुरू करणार
·        वाराणसी येथे मदनमोहन मालवीय यांच्या नावाने रेल्वेचे अध्यासन केंद्र सुरु होणार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा