| 
·      २५
  जानेवारी :
  राष्ट्रीय
  मतदार दिन | 
| 
·      इस्लामिक
  स्टेट ऑफ
  सराक अँड
  सीरिया (इसिस) या
  दहशतवादी
  संघटनेने अपहरण
  केलेल्या
  जपानच्या
  दोन
  नागरिकांपैकी
  एकाची हत्या
  केल्याचा
  व्हिडिओ
  प्रसिद्ध केला आहे.  
·     
  ‘इसिस’ने
  हत्या
  केलेला
  जपानी
  नागरिक हरुना याकुवा
  याच्यासह
  केंजी गोटो
  यांचेही
  गेल्यावर्षी
  अपहरण
  करण्यात
  आलेले होते.  
·      ‘इसिस’ने
  हा व्हिडिओ
  प्रसिद्ध
  करताना
  दुसरा जपानी नागरिक
  सुखरूप हवा
  असेल तर
  पैशांची
  मागणी केली
  आहे. यापूर्वी
  ‘इसिस’ने
  या दोन्ही
  नागरिकांच्या
  सुटकेसाठी १२०० कोटी
  रुपयांची
  मागणी केली होती. | 
| 
·      भारतरत्न
  डॉ.
  बाबासाहेब
  आंबेडकर
  यांनी उच्चशिक्षण
  घेताना लंडनमध्ये
  वास्तव्य
  केलेले
  ऐतिहासिक घर राज्य
  सरकारने खरेदी
  करण्याचा
  निर्णय घेतल्याचे
  मंत्री
  विनोद तावडे
  यांनी आज ट्विटरद्वारे
  सांगितले. 
·     
  “हेरिटेज” वास्तू  
·     
  डॉ.
  आंबेडकरांनी
  १९२१-२२ या काळात
  लंडन स्कूल
  ऑफ
  इकॉनॉमिक्समध्ये
  शिकताना १०, किंग
  हेन्री रोड
  या
  निवासस्थानी
  वास्तव्य केले
  होते.  
·      हे
  निवासस्थान
  ब्रिटिश
  सरकारनेही “हेरिटेज” वास्तू
  म्हणून
  जाहीर केली
  असून, “भारतीय
  सामाजिक
  लढ्याचे
  अग्रणी डॉ.
  भीमराव रामजी
  आंबेडकर
  यांचा निवास
  येथे होता,”अशी
  पट्टीकाही घरावर
  लावली आहे. | 
| 
·      अमेरिकेचे
  अध्यक्ष
  बराक ओबामा
  भारत दौऱ्यावर
  आल्यानंतर व्हाईट
  हाऊसकडून
  करण्यात
  आलेल्या
  ट्विटमध्ये ‘जय
  हिंद’ असा
  उल्लेख करण्यात
  आला आहे. | 
| 
·      राज्यात २६
  जानेवारी २०१५ रोजी ‘जलमुक्त
  शिवार अभियान’चे
  उद्घाटन होणार आहे. 
·     
  ग्रामविकास
  खात्याच्या
  या
  महत्त्वाकांक्षी
  योजनेअंतर्गत
  १० हजार गावं
  दुष्काळमुक्त
  करण्याचा
  संकल्प करण्यात
  येणार आहे. 
·      ग्रामविकास
  मंत्री:
  पंकजा मुंडे | 
| 
·      भारतीय
  निवडणूक
  आयोग २५ जानेवारीला
  देशभरात
  पाचवा
  राष्ट्रीय 
  मतदार दिन
  साजरा करत असून यंदाची 
  संकल्पना
  “सोपी
  नोंदणी, सोपी
  दुरुस्ती” अशी आहे. 
·     
  राष्ट्रीय
  कार्यक्रम
  नवी दिल्ली
  येथील जवाहरलाल
  नेहरु
  स्टेडिअमच्या
  भारत्तोलन
  सभागृहात माजी
  राष्ट्रपती
  ए.पी.जे.
  अब्दुल कलाम
  यांच्या
  अध्यक्षतेखाली
   होणार
  आहे. 
·      निवडणूक
  आयोगाची
  स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली असून
  मतदारनोंदणी
  वाढवणे, खासकरुन
  पात्र
  नवमतदारांची 
  नोंदणी करुन
  घेणे हे
  राष्ट्रीय
  मतदार
  दिनाचे
  उद्दिष्ट
  आहे. | 
| 
·      अस्तंगत
  होत
  चाललेल्या
  गिधाडांची
  संख्या वाढत
  असल्यामुळे
  चर्चेत
  आलेले
  अभयारण्य:
  कुनो
  वन्यजीव
  अभयारण्य
  (मध्य प्रदेश) 
·      २००३ मध्ये
  मोठ्या संख्येने
  मरण
  पावल्यामुळे
  गिधाडे
  अस्तंगत होण्याचा
  धोका
  निर्माण
  झाला होता. | 
| 
·      राज्य
  सरकारी
  कर्मचाऱ्यांचे
  निवृत्तीचे
  वय ६० वरून
  ५८ करण्याचा
  हरयाणाचे
  मुख्यमंत्री
  मनोहरलाल खट्टर
  सरकारचा
  निर्णय
  पंजाब आणि
  हरयाणा उच्च
  न्यायालयाने
  वैध ठरविला आहे. | 
चालू घडामोडी - २५ जानेवारी २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
 

 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा