·
दिल्ली
विधानसभेच्या
७० पैकी ६७
जागा जिंकून ‘आप’ने
दिल्लीत नवा
इतिहास रचला आणि ‘मोदी
चमत्कारा’च्या
आशेवर
असलेल्या भाजपच्या
वाट्याला
फक्त तीन
जागा आल्या.
कॉंग्रेस
आणि बसप ला
भोपळाही
फोडता आला
नाही.
·
गेल्या
निवडणुकीत
भाजपला
सर्वाधिक
जागा ३२ मिळाल्या
होत्या आणि ‘आप’ला
दुसऱ्या
क्रमांकाच्या
म्हणजेच २८
जागा मिळाल्या
होत्या, काँग्रेसला
आठ जागा
मिळाल्या
होत्या.
·
दिल्लीमध्ये
मिळालेल्या
एकतर्फी
विजयानंतर अरविंद
केजरीवाल १४
फेब्रुवारीला
रामलीला मैदानावर
मुख्यमंत्रिपदाची
शपथ घेणार आहेत.
·
केजरीवाल
यांनी नवी
दिल्ली
मतदारसंघातून
भाजपच्या
नूपुर शर्मा
यांचा ३१
हजार ५८३
मतांनी
पराभव केला.
·
विशेष
म्हणजे, गेल्या
वर्षी
केजरीवाल
यांनी १४
फेब्रुवारीलाच
दिल्लीच्या
मुख्यमंत्रिपदाचा
राजीनामा
दिला होता. ४९
दिवसांचे
सरकार चालवून
गेल्या
वर्षी
राजीनामा
दिलेले केजरीवाल
आता बरोबर एक
वर्षानंतर
मात्र अधिक
शक्तीने आणि
संपूर्ण
बहुमताच्या
जोरावर
पुन्हा एकदा
मुख्यमंत्रिपदाची
शपथ घेणार
आहेत.
·
दिल्ली
निवडणूक
निकालाची
वैशिष्ट्ये
·
विधानसभेत
आपच्या पाच
महिला सदस्य.
·
भाजपच्या
मुख्यमंत्रिपदाच्या
उमेदवार
किरण बेदींचा
पराभव
·
दारुण
पराभवानंतर
काँग्रेसचे
नेते अजय माकन
यांचा
सरचिटणीस
पदाचा
राजीनामा
·
सर्व
जागा
लढवूनही
बसपला एकही
जागा नाही
·
केंद्रात
मोदी सरकार
आल्यानंतर
प्रथमच जोरदार
धक्का
·
‘आप’च्या
तिकीटावर
चार मुस्लिम
उमेदवार
विजयी
·
किरण
बेदींना
पराभूत
करणारे
एस.के.बग्गा
ठरले जायंट
किलर
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा