·
कुसुमाग्रज
प्रतिष्ठानच्या
वतीने
देण्यात
येणारा “जनस्थान
पुरस्कार” ज्येष्ठ
पत्रकार आणि साहित्यिक
अरुण साधू
यांना जाहीर
झाला असून,
प्रतिष्ठानचे
अध्यक्ष
मधू मंगेश
कर्णिक
यांनी या
पुरस्काराची
घोषणा केली.
·
रोख
एक लाख रुपये, मानचिन्ह
आणि मानपत्र
असे या
पुरस्काराचे
स्वरूप आहे.
कुसुमाग्रज
यांच्या
जन्मदिनी (२७
फेब्रुवारी)
नाशिक येथे
या
पुरस्काराचे
वितरण होणार
आहे.
·
जनस्थान
पुरस्काराची
सुरवात १९९१
पासून करण्यात
आली. कुसुमाग्रज
प्रतिष्ठानच्या
वतीने दर दोन
वर्षांनी हा
पुरस्कार
देण्यात
येतो.
·
विजय
तेंडुलकर हे
पहिल्या
पुरस्काराचे
मानकरी ठरले, तर २०१३चा
पुरस्कार
भालचंद्र
नेमाडे
यांना
देण्यात आला.
·
या
पुरस्काराने
आजपर्यंत
विंदा
करंदीकर, इंदिरा
संत, गंगाधर
गाडगीळ, व्यंकटेश
माडगूळकर, श्री.
ना. पेंडसे, मंगेश
पाडगावकर, नारायण
सुर्वे, बाबूराव
बागूल, ना. धों.
महानोर,महेश
एलकुंचवार
यांना
सन्मानित
करण्यात आले
आहे.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा