चालू घडामोडी - १९ फेब्रुवारी २०१५

·        १९ फेब्रुवारी १६३० : पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. शिवाजी महाराज यांचा जन्म
·          संगणक तंत्रावर आधारित “आपलं सरकार” ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची अभिनव संकल्पना सामान्य जनतेच्या पसंतीला उतरत आहे.
·          “आपलं सरकार” या पोर्टलवर प्रत्येक नागरिक स्वत:ची तक्रार मांडू शकतो. सरकार दरबारी प्रलंबित प्रकरणाचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी या पोर्टलचा वापर वाढत आहे. २६ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या पोर्टलवर २३७९ तक्रारी दाखल झाल्या.
·          सध्या प्रत्येक दिवशी १०० ते ११० तक्रारी पोर्टलवरून मिळत आहेत.
·          देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योजक मुकेश अंबानी यांना इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई संस्थेकडून डॉक्टर ऑफ सायन्सही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे.
·          हा सन्मान प्राप्त करणारे मुकेश अंबानी चौथे व्यक्ती आहेत. ते स्वतः या संस्थेचे विद्यार्थी आहेत. त्यांनी या संस्थेतून केमिकल इंजीनियरिंगची पदवी मिळवलेली आहे.
·          ईशान्य म्यानमारमधील चीनच्या सीमारेषेस लागून असलेल्या कोकांग भागामध्ये सरकार व कोकांग बंडखोरांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामध्ये किमान २६ बंडखोर ठार झाले.
·          म्यानमारमधील कोकांग जमातीच्या प्रभावशाली नेत्यास २००९ साली देशाबाहेर हाकलून लावण्यात आले होते. परंतु या बंडखोर नेत्याच्या म्यानमारमधील पुन:प्रवेशानंतर या भागामध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे.
·          या भागामध्ये म्यानमारने लष्करी कायदा लागू केला आहे.
·          लीबियावरील शस्त्रविक्रीसंदर्भात लादण्यात आलेले निर्बंध उठवून इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचा सामना करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन लीबियाच्या परराष्ट्र मंत्री मोहम्मद अल-दिरी यांनी  संयुक्त राष्ट्रसंघास केले आहे.
·          कुप्रसिद्ध हुकूमशहा मुअम्मद गद्दाफी याच्या कार्यकाळात झालेल्या हिंसाचारामध्ये नागरिकांच्या रक्षणासाठी या देशावर शस्त्रविक्रीसंदर्भातील निर्बंध लादण्यात आले होते.
·          देशातील धान्योत्पादनाबाबतच्याAgriculture Production 2014-15 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार २०१४-१५ या वर्षातील धान्याचे उत्पादन २५ कोटी ७० लाख टनांच्या आसपास असेल, असे आज कृषी मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.
·          गेल्या वर्षी (यूपीए-२ च्या काळात) देशात विक्रमी, म्हणजे २६ कोटी ५५ लाख ७० हजार टन धान्योत्पादन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे धान्योत्पादन ८५ लाख टनांनी कमी आहे.
·          मॉन्सूनच्या पावसात १२ टक्‍क्‍यांनी घट झालेली असतानाही, तरी त्या तुलनेत कृषि उत्पादनातील कपात केवळ तीन टक्‍क्‍यांपर्यंतच रोखण्यात यश मिळविल्याचा दावा कृषी मंत्रालयाने केला आहे.
·          स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू असताना देशविरोधात कारवाया करणाऱ्या जमात-ए-इस्लामी पक्षाच्या अब्दुल सुभान (वय ८०) या नेत्याला बांगलादेशातील विशेष न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली.
·          ३ फेब्रुवारी १९२५ रोजी सीएसटी (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) ते कुर्ला स्टेशनपर्यंत पहिली विजेवरील लोकल धावली होती या घटनेला नुकतीच ९० वर्षे पूर्ण झाली.
·          महिला व बालविकास विभागाच्या कामात पारदर्शकता आणि सूसुत्रता आणण्यासाठी अंब्रेला ट्रॅकिंग सिस्टीमचा (यूटीएस) अवलंब करण्यात येणार आहे.
·          त्यासाठी १८१ हा टोल फ्री क्रमांक आहे.
·          महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांना अंतर्गत पालघर जिल्हा अभियान व पालघर जिल्हा परिषदेमार्फत एक कुटुंब,एक नोकरी योजना राबविण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा