·
प्रसिद्ध
दिग्दर्शक
नागेश
कुकनूर
याच्या “धनक” या
कलाकृतीस ६५
व्या बर्लिन
आंतरराष्ट्रीय
चित्रपट
महोत्सवामधील
सर्वोत्कृष्ट
“फीचरलेंथ” चित्रपटासाठीचा
ग्रॅंड
प्रिक्स
पुरस्कार मिळाला
आहे.
याचबरोबर
महोत्सवामधील
किड्स
ज्युरींनीही
धनकचा विशेष
उल्लेख केला.
·
“धनक”च्या
केंद्रस्थानी
एका सुंदर
गावामधील १०
वर्षांची ‘परी’
व तिचा
आठवर्षीय
धाकटा भाऊ ‘छोटु’
ही पात्रे
आहेत. यामधील परीची
भूमिका हेतल
गडा हिने,
तर छोटुचे
पात्र क्रिश
छाब्रिया याने
साकारले
होते. कुकनूर
याने स्वत:
यासंदर्भातील
माहिती ट्विटरवरुन
दिली.
·
जफर
पनाही या
इराणच्या
प्रसिद्ध
दिग्दर्शकास
या
वर्षीच्या
बर्लिन
आंतरराष्ट्रीय
चित्रपट
महोत्सवामधील
सर्वोच्च
गोल्डन बेअर
पुरस्काराने
गौरविण्यात
आले आहे.
‘टॅक्सी’
या
चित्रपटासाठी पनाही
यांना हा
पुरस्कार
देण्यात आला.
·
पनाही
यांना “इराणमधील
सत्तेविरोधात
प्रचार
केल्याच्या” आरोपांतर्गत
स्थानबद्ध
करण्यात आले
आहे. पनाही
यांच्यावर २०१०
मध्ये
चित्रपट
बनविण्यासंदर्भात
२० वर्षांची
बंदी घालण्यात
आली आहे.
मात्र
त्यानंतरही
पनाही यांनी
चित्रपट बनविणे
सोडलेले
नाही.
·
चिलीचे
दिग्दर्शक
पाब्लो
लॅरेन यांना ‘द
क्लब’ या
चित्रपटासाठी
सिल्व्हर
बेअर
या
महोत्सवामधील
द्वितीय
सर्वोच्च
पुरस्काराने
गौरविण्यात
आले.
|
Chaan
उत्तर द्याहटवा