· २८
जानेवारी :
लाला
लजपतराय
जयंती
|
· राज्य
शासनाचे लोकमान्य
टिळक जीवन
गौरव
पत्रकारिता
पुरस्कार ज्येष्ठ
पत्रकार आणि
संपादक लक्ष्मण
त्र्यंबकराव
जोशी (२०११), विजय
विश्वनाथ
कुवळेकर (२०१२) तसेच दिनकर
केशव रायकर (२०१३) यांना
जाहीर
करण्यात आले
आहेत.
· यासोबतच
गेल्या तीन
वर्षातील
विविध
गटातील
उत्कृष्ट
पत्रकारिता
पुरस्कार
देखील जाहीर
करण्यात आले
आहेत.
|
· कॉंग्रेस
नेते शशी
थरूर
यांच्या
पत्नी सुनंदा
पुष्कर
यांच्या
खूनप्रकरणाच्या
चौकशीसाठी नेमण्यात
आलेल्या
दिल्ली
पोलिसांच्या
विशेष तपास
पथकाकडून
(एसआयटी) अमरसिंह
यांची दोन
तास कसून
चौकशी
करण्यात आली.
|
· पेशावरमधील
लष्करी
अधिकाऱ्यांच्या
शाळेवर
गेल्या
महिन्यात
झालेल्या
दहशतवादी
हल्ल्यानंतर
आता वायव्य
पाकिस्तानमधील
शिक्षकांना
बंदूक बाळगण्याचे
आणि
चालविण्याचे
प्रशिक्षण
देण्यात येत
आहे.
·
वायव्य
पाकिस्तानमध्ये
येत
असलेल्या पेशावरमधील
शाळेवर
तालिबानी
दहशतवाद्यांनी
भीषण हल्ला केला
होता. हल्ल्यात
१५० जणांचा
मृत्यू
झाला होता.
यामध्ये १३२
लहान
मुलांचा
समावेश होता.
· या
हल्ल्यानंतर
वायव्य
पाकिस्तानमध्ये
सुरक्षा
व्यवस्था
कडक करण्यात
आली आहे. तसेच
शाळांनाही
सुरक्षा
पुरविण्यात
आली आहे.
तसेच प्रांतातील
प्रत्येक
शाळेत
शस्त्रास्त्रे
ठेवण्याची
परवानगी
देण्यात आली
आहे.
|
· सुदानची
राजधानी
असलेल्या
खार्टूम
येथे राष्ट्राध्यक्ष
ओमर अल-बशीर
यांच्यासाठी
चीनने
विस्तीर्ण
राजवाडा बांधला
आहे.
· सुदान
हा आफ्रिका
खंडामधील
नैसर्गिक
तेलाने
समृद्ध
असलेला देश
आहे. या
भागामध्ये
आपला प्रभाव
वाढविण्यासाठी
चीन
प्रयत्नशील
आहे.
|
· एअर एशिया
क्युझेड ८५०१
या
अपघातग्रस्त
विमानाच्या उर्वरित
अवशेषांचा
शोध
घेण्याची
मोहिम इंडोनेशियाच्या
लष्कराने
अखेर
थांबविली आहे.
·
इंडोनेशियामधील
सुब्राया
येथून
सिंगापूरकडे
जाणारे हे
विमान जावा
समुद्रामध्ये
एक महिन्यापूर्वी
(२८ डिसेंबर)
कोसळले होते.
या
अपघातामुळे
विमानामधील
सर्व १६२ प्रवासीही
मृत्युमुखी पडले
होते.
· आत्तापर्यंत
अपघाताच्या
ठिकाणाहून ७० मृतदेह
बाहेर
काढण्यात यश आले
आहे. जावा
समुद्रामधील
अपघात
स्थळामधून
मृतदेह बाहेर
काढण्याचे
काम सुरुच रहाणार
आहे.
|
· लीबियाची
राजधानी
त्रिपोली
शहरातील एका
पंचतारांकित
हॉटेलवर
झालेल्या
हल्ल्यात
पाच परदेशी
नागरिकांसह
नऊ जणांचा
मृत्यू झाला
आहे.
· या
हल्ल्याची
जबाबदारी
इसिसने
स्वीकारली आहे.
|
· प्रजासत्ताक
दिनी
शौर्यपदक
जाहीर
झालेले कर्नल
एम. एम. राय २७
जानेवारी
रोजी
झालेल्या
चकमकीत
हुतात्मा
झाले. जम्मू
आणि काश्मीरमधील
पुलवामा
जिल्ह्यात
झालेल्या
चकमकीत राय
यांच्याबरोबर
एक पोलिस
अधिकारीही
हुतात्मा झाले आहेत.
· मिंडोरा
गावात
झालेल्या या
चकमकीत हिजबुल
मुजाहिदीनच्या
दोन
दहशतवाद्यांनाही
ठार झाले
आहेत.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा