चालू घडामोडी - १ फेब्रुवारी २०१५

·        २ फेब्रुवारी २०१५ : जागतिक दलदलयुक्त जमीन दिवस (World Wetlands Day)
·        पाच हजार किमीचा टप्पा गाठू शकणाऱ्या, उत्तरेच्या टोकावरील चीनची महत्त्वाची शहरे तसेच प्रसंगी युरोपलाही लक्ष्य करू शकणाऱ्या व देशातील कोणत्याही कोपऱ्यावरून लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेल्या अग्नी-५ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर्स आयलॅंड येथून यशस्वी चाचणी झाली. विशेष म्हणजे एका स्टीलच्या नळकांडातून (कॅनिस्टरमधून) क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याचे तंत्रज्ञान याद्वारे भारताने विकसित केले आहे.
·        कॅनिस्टर उपकरणाचे फायदे
·        शंक्वाकृती आकाराच्या कॅनिस्टरच्या साह्याने अत्यंत कमी वेळात क्षेपणास्त्र डागता येऊ शकते.
·        तसेच खात्रीशीरपणा, टिकाऊ, कमी देखभाल खर्च आणि हालचालीमध्ये अधिक सुलभता ही कॅनिस्टरची वैशिष्ट्ये आहेत.
·        तज्ज्ञांच्या मते, कॅनिस्टरमुळे क्षेपणास्त्र रस्त्यावरून अथवा रेल्वेमधूनही डागता येऊ शकते. यामुळे त्याची गुप्तता राखण्यास मदत होते. या आधी क्षेपणास्त्र विशिष्ट ठिकाणाहूनच डागता येत असे आणि त्यामुळे शत्रूला ते ठिकाण शोधून त्यावर हल्ला करणे शक्‍य होत होते.
·        अग्नी-५AGNI-V ची वैशिष्ट्ये
·        लांबी : १७ मीटर
·        वजन : ५० टन
·        पल्ला : ५००० किमी
·        प्रकार : जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे
·        इंधन : घनरूप
·        अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता : १ टन
·        भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपचे नेते कुमार विश्वास यांच्या विरोधात लिंगभेदकारक आरोप केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
·        विश्वास यांनी आरोपांचा इन्कार करतानाच, आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन; पण ते सिद्ध न झाल्यास बेदींनी राजकारण सोडावेअसे आव्हान दिले आहे.
·        नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्यावरील एका बातमीचे प्रक्षेपण दूरदर्शनच्या गुजरातमधील गिरनार वाहिनीवरून करण्यात आले. त्याची शिक्षा म्हणून दूरदर्शनच्या सहाय्यक संचालक व्ही. एम. वनोळ (५८) यांची अहमदाबादहून थेट अंदमानला बदली करण्यात आली आहे.
·        राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूची साथ आली असून राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही या आजाराची लागण झाली आहे.
·        जन्मनियंत्रणा करणाऱ्या पहिल्या वैद्यकीय रसायनाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कार्ल डिजेरसी (वय-९१ वर्षे) यांचे कर्करोगाने निधन झाले.
·        विधानसभा आणि विधान परिषद या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना अर्थात आमदारांना दोन खोल्यांचे वाटप केले जाते. त्यापैकी एक खोली आता विधानमंडळ सचिवालयाकडे जमा करावी लागणार आहे. ती नाही केल्यास संबंधित आमदारांकडून दंड वसूल केला जाणार असल्याचे पत्र सर्व लोकप्रतिनिधींना विधानसभा सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी पाठवले आहे.
·        आमदारांकडील एक खोली वगळता इतर खोलीत आमदारांचे पाहुणे, नातेवाईक, कार्यकर्ते यांना आमदारांच्या सहमती पत्राचा वापर करून केवळ तीन दिवसांसाठी शासकीय दराने शुल्क आकारून राहता येईल.
·        मिग-२१ या लढाऊ विमानांच्या अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा गुजरातमधील जामनगर येथे हे विमान कोसळले. सुदैवाने वैमानिकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने त्याचे प्राण बचावले.
·        मागील चार दिवसांतील मिग विमानाचा हा दुसरा अपघात आहे. याआधी २७ जानेवारी रोजी राजस्थानमधील बारमेरमध्ये हे विमान कोसळले होते. हवाई दलाने या विमान अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
·        पुन्हा एकदा आपल्या खणखणीत सर्व्हिसच्या जोरावर अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शारापोव्हावर मात करून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले.
·        महिला एकेरीच्या अंतिम लढतीत शनिवारी सेरेनाने द्वितीय मानांकित शारापोव्हाला ६-३, ७-६(७-५) असे पराभूत केले आणि विजेतेपद मिळवले.
·        पंधरावर्षांच्या पूर्वीच्या वाहनांवर उत्तर प्रदेश सरकारच्या वाहतूक विभागाने हरित कर आकारण्यास सुरुवात केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा