चालू घडामोडी : ०८ डिसेंबर

साक्षीदार सुरक्षा योजना

  • सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या साक्षीदार सुरक्षा योजना २०१८ला मंजुरी दिली आहे आणि केंद्र व राज्यांना योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने ही योजना विकसित केली होती.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या मते, केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे याबाबत कायदा लागू केला जाईपर्यंत ही योजना संविधानाच्या कलम १४१ व १४२ अंतर्गत कायदा म्हणून लागू केली जाणार आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना १ वर्षाच्या आत वल्नरेबल विटनेस डीपॉझिशन कॉम्प्लेक्स (व्हीब्लूडीसी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
  • याचे मुख्य कारण म्हणजे स्वत:च्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात साक्षीदार साक्ष देऊ शकत नाही.
  • त्यामुळे न्यायिक प्रक्रियेस मजबूत करण्यासाठी साक्षीदारांना सुरक्षा प्रदान करणे आवश्यक आहे.
साक्षीदार संरक्षण योजना
  • १८ राज्य व केंद्र शासित प्रदेश, ५ राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरण, पोलिस आणि ३ उच्च न्यायालये यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालयाने ही योजना विकसित केली होती.
  • राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाशी (NALSA) चर्चा झाल्यानंतर या योजनेला अंतिम स्वरूप देण्यात आले.
  • या योजनेचा उद्देश साक्षीदारांना सुरक्षा प्रदान करणे आहे ज्यामुळे निष्पक्ष न्यायिक प्रक्रियेचे संचालन सुनिश्चित करता येईल.
योजनेची वैशिष्ट्ये
  • धोक्याच्या श्रेणी ओळखणे.
  • पोलीस प्रमुखाने धोक्याचा विश्लेषण अहवाल तयार करणे.
  • नोंदींची गोपनीयता आणि संरक्षण.
  • साक्षीदारांची ओळखीचे सुरक्षा, ओळख बदल आणि साक्षीदारांचे संरक्षण.
साक्षीदारांच्या श्रेण्या
  • साक्षीदार किंवा त्याच्या कुटुंबाला धोका.
  • साक्षीदाराची सुरक्षा, संपत्ती व कौटुंबिक सदस्य इत्यादींना धोका.
  • साक्षीदारांची सुरक्षा, संपत्ती, कुटुंब इत्यादींना मध्यम स्तराचा धोका.
  • वरील श्रेणीचे साक्षीदार जिल्ह्याच्या सक्षम प्राधिकरणासमोर सुरक्षेसाठी अर्ज करू शकतात. सक्षम अधिकारी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश असू शकतात.

क्लीन सी २०१८: तटरक्षक बलाचा अभ्यास

  • भारतीय तटरक्षक बलाने पोर्ट ब्लेअरमध्ये ‘क्लीन सी २०१८’ या अभ्यासाचे आयोजन केले. सागरातील तेल गळतीच्या घटना रोखण्याचा सराव करणे हा या अभ्यासाचा हेतू होता.
  • हा अभ्यास नॅशनल ऑइल स्पिल डिझास्टर कंटिजेन्सी प्लांटचा (एनओएस-डीसीपी) भाग आहे.
  • या अभ्यासात भारतीय तटरक्षक बलाच्या विश्वस्त, विजित, राजवीर, राजश्री, ४ इंटरसेप्टर बोट, डोर्नियर विमान आणि चेतक हेलीकॉप्टर सहभागी झाले.
  • निकोबार बेट आणि उत्तर सुमात्राच्या दरम्यानचा ग्रेट चॅनल हा एक व्यस्त समुद्र मार्ग आहे. या १६० रुंदीच्या खाडीतून रोज २०० जहाज परिवहन करतात. हा जगातील सर्वात व्यस्त समुद्री मार्गांपैकी एक आहे.
  • हे क्षेत्र तेल गळतीसारख्या घटनेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे तेल गळतीच्या घटना होण्यापासून रोखण्यासाठी हा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.
  • या अभ्यासाद्वारे तेल गळती होण्यापासून रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या तयारीचे अवलोकन केले गेले.
  • हा अभ्यास २ टप्प्यात आयोजित करण्यात आला होता. या अभ्यासात तटरक्षक बलाच्या आयसीजी डोर्नियर आणि चेतक हेलिकॉप्टरचा वापर हवाई सर्वेक्षणासाठी केला गेला.
  • संरक्षण मंत्रालयांतर्गत भारतीय तटरक्षक दलाला सागरी वातावरण आणि सागरी क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
  • तेल गळतीच्या घटनांसाठी नॅशनल ऑइल स्पिल डिझास्टर कंटिजेन्सी प्लांटची स्थापना करण्यात आली आहे.
  • याव्यतिरिक्त मुंबई, चेन्नई आणि पोर्ट ब्लेयर येथे ३ प्रदूषण प्रतिसाद केंद्रांची स्थापनाही करण्यात आली आहे.

व्हेनेसा पोन्स डे लियॉन बनली मिस वर्ल्ड २०१८

  • मेक्सिकोच्या व्हेनेसा पोन्स डे लियॉन हिने मिस वर्ल्ड २०१८चा किताब पटकावला. गतवर्षीची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने व्हेनेसाला मिस वर्ल्ड क्राऊन प्रदान केला.
  • चीनच्या सान्या या शहरामध्ये ६८वी मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली. यात जगभरातील ११८ प्रतिस्पर्ध्यांनी भाग घेतला.
  • व्हेनेसा या स्पर्धेची विजेती ठरली. तर थायलँडची निकोलेन पिशापा ही फर्स्ट रनर अप ठरली.
  • या स्पर्धेत भारतातर्फे तामिळनाडूच्या अनुकृती वासनेही सहभाग घेतला होता. ती टॉप ३० मध्येही पोहचली. मात्र टॉप-१२ मध्ये अनुकृती पोहचू शकली नाही.
  • व्हेनेसाचा जन्म ७ मार्च १९९२ रोजी मेक्सिकोच्या गुअनजुआतो येथे झाला. ती मिस वर्ल्ड किताब जिंकणारी पहिली मेक्सिकन महिला आहे.
  • यापूर्वी तिने मेक्सिकोज नेक्स्ट टॉप मॉडेल स्पर्धा जिंकली आहे. तसेच मिस वर्ल्ड मेक्सिको २०१८ स्पर्धेचेही ती विजेता आहे.
  • व्हेनेसाने इंटरनॅशनल बिझनेस कोर्स केला आहे. सध्या ती मुलींसाठी चालवण्यात येणाऱ्या एका पुनर्वसन केंद्राची संचालक आहे.

कार्बन उत्सर्जनात भारत जगात चौथा

  • ग्लोबल कार्बन प्रोजेक्टद्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, भारत जगातील चौथा सर्वात मोठा कार्बन डायऑक्साइड उत्पादक देश आहे.
  • या अभ्यासानुसार जगातील १० सर्वाधिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन करणारे देश: चीन, अमेरिका, युरोपियन युनियन, भारत, रशिया, जपान, जर्मनी, इराण, सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया.
  • २०१७मध्ये जगातील एकूण ७ टक्के कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन भारताने केले आहे.
  • २०१८मध्ये भारतातील कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामध्ये ६.३ टक्क्यांची वाढ झाली. यामध्ये कोळसा (७.१ टक्के), तेल (२.९ टक्के) आणि गॅस (६ टक्के) यांचा मोठा वाटा आहे.
  • भारत व चीन अजूनही मोठ्या प्रमाणावर कोळशावर अवलंबून आहेत तर अमेरिका व युरोपियन संघ हळूहळू कमी कार्बन उत्सर्जनात घट करत असल्याचे, या अभ्यासात आढळून आले.
  • कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यासाठी भारत सौर ऊर्जा वापरावर निरंतर कार्य करत आहे.
  • कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये आपली सशक्त भूमिका बजावण्याची गरज आहे.
  • हा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषद २०१८च्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आला. २०१८मध्ये तेल आणि वायूच्या वापराच्या वाढीमुळे कार्बन डाईऑक्साइड उत्सर्जन वाढण्याचा नादाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

८ डिसेंबर: भारतीय नौदल पाणबुडी दिन

  • ८ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल पाणबुडी दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.
  • ८ डिसेंबर १९६७ रोजी भारतीय नौदलातील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरीचा नौदलात समावेश करण्यात आला होता.
भारतीय नौदल
  • भारताच्या सागरी सुरक्षेमध्ये नौदलाचे योगदान महत्त्वपूर्ण असे आहे. आज भारताचे नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे.
  • भारतीय नौदल भारतीय सशस्त्र दलांचा एक भाग आहे. भारताच्या तिन्ही दलांचे सरसेनापती देशाचे राष्ट्रपती आहेत.
  • भारतीय नौसेनेचे ब्रीदवाक्य ‘शं नो वरुणः’ आहे. सध्या नौदलाचे प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा आहेत.
  • भारतीय नौदलात सध्या ६७,२२८ सैनिक/कर्मचारी कार्यरत आहेत. भारतीय नौदलाची स्थापना १९३४मध्ये झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हंटले जाते.
  • भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.
  • भारतीय नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या ताफा आहे. याशिवाय स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतदेखील नौदलात सामील आहे.
  • नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॉरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.

चंद्राच्या अभ्यासासाठी चीनचे चांगई-४ मिशन लाँच

  • चीनने ७ डिसेंबर २०१८ रोजी चांगई-४ (Chang'e-4) या चंद्राच्या आतापर्यंतच्या सर्वात दूरच्या भागात पोहचण्यासाठी मिशन लाँच केले आहे. चीनचे अशा प्रकारचे हे पहिलेच मिशन आहे.
  • चांगई-४ हे चंद्रशोधक यान असून मार्च ३-बी प्रक्षेपकाच्या सहाय्याने नैर्ऋत्य चीनमधील शिचांग प्रक्षेपण केंद्रावरून त्याचे प्रक्षेपण करण्यात आले.
  • चंद्राची एक बाजू कधीच पृथ्वीला सामोरी येत नाही, अशा चंद्राच्या अद्याप अभ्यासल्या न गेलेल्या अंधाऱ्या बाजूकडील भागात चीनचे यान उतरणार आहे.
  • या भागात यान उतरवणारा चीन हा पहिला देश ठरणार आहे. १९५९मध्ये सोविएत युनियनने या भागाच्या पहिल्या प्रतिमा घेतल्या होत्या.
  • चांगई-४मध्ये एक लँडर आणि एक रोव्हर यांचा वापर करण्यात आला आहे. हे चीनचे दुसरे चंद्रयान व रोव्हर आहे.
  • यातील लँडरचे वजन १२०० किलो असून, त्याचा कार्यकाल १२ महिने आहे. तर रोव्हरचे वजन १४० किलो असून, त्याचा कार्यकाल ३ महिने आहे.
  • जानेवारी २०१९मध्ये हे यान चंद्रावर उतरण्याची शक्यता असून त्याच्या मदतीने तेथे अनेक प्रयोग केले जाणार आहेत.
  • चांगई-४ यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एटकनमध्ये वोन करमन क्रेटरमध्ये उतरणार आहे. यात चीनचे ६ तर इतर देशांचे ४ प्रयोग समाविष्ट आहेत.
  • यात यंत्रमानवरूपी लँडरशी संपर्क साधणे हे चीनसाठी आव्हान आहे. कारण चंद्राची ही बाजू पृथ्वीस सामोरी नसते. त्यामुळे तेथून थेट संदेश मिळत नाही.
  • चीनने यावर उपाय म्हणून मॅगपी ब्रिज म्हणजे क्वेकियाओ नावाचा उपग्रह चंद्राच्या कक्षेत सोडून त्याच्या मार्फत लँडर व पृथ्वी यांच्यात संपर्क प्रस्थापित करण्याची कल्पना राबवली आहे.
  • चंद्रावरील रात्र पृथ्वीवरील १४ दिवसांसमान असते. त्या वेळी तेथील तापमान उणे १७३ अंश सेल्सियस असते. तेथील दिवस पृथ्वीवरील १४ दिवसांसमान असतो, तेव्हा तापमान १२७ अंश सेल्सियस असते.

इटलीकडून फेसबुकवर १० दशलक्ष युरोचा दंड

  • परवानगीशिवाय वापरकर्त्यांच्या माहितीचा वापर केल्याप्रकरणी इटलीने फेसबुकवर १० दशलक्ष युरोचा (सुमारे ८१ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे.
  • इटलीच्या ग्राहक आणि बाजार वॉचडॉगने हा दंड ठोठावला. या इटालियन वॉचडॉगने फेसबुकला त्यांच्या अॅप व वेबसाइटवर माफीनामा प्रदर्शित करण्याचा आदेशही दिला आहे.
  • केंब्रिज अॅनालिटीकाच्या डाटा लीक प्रकरणी ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण न झाल्याबद्दल फेसबुकला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
  • या डाटा लीक प्रकरणामुळे सोशल मिडीयातील अग्रणी असलेल्या फेसबुकची मोठी नाचक्की झाली होती.
  • यापूर्वी याचप्रकरणी फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने (डेटा रेग्युलेटर) ५ लाख पाऊंडचा दंड ठोठावला होता.
  • २००७ ते २०१४ दरम्यान फेसबुकच्या ८७ दशलक्ष वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचा बेकायदेशीर वापर अॅप्लिकेशन डेव्हलप करणाऱ्या अन्य संस्थेकडून केला गेला होता.
  • त्या माहितीच्या वापरासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली गेली नव्हती. ग्राहकांनी अॅप डाऊनलोड केले नव्हते. पण फेसबुक वापरणाऱ्यांचे मित्र असले तरीही त्यांच्या माहितीचा वापर केला गेला होता.
  • ग्राहकांच्या माहितीच्या बेकायदेशीर वापराबाबत फेसबुकसारख्या मोठ्या कंपनीने व्यवस्थित काळजी घेतली नाही.
  • हे डाटा लीक प्रकरण २०१५मध्ये उघड झाले. त्यानंतरही फेसबुकने प्रभावी उपाय योजना केल्या नाहीत, असे आरोप फेसबुकवर आहेत.
फेसबुक
  • फेसबुक ही जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी आहे. व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम या तिच्या उपकंपन्या आहेत.
  • फेसबुकची स्थापना ४ फेब्रुवारी २००४ रोजी झाली. मार्क जुकरबर्ग, एडुआर्डो सॅवेरिन, अँड्र्यू मॅककॉलम, डस्टिन मोस्कोविट्झ आणि ख्रिस ह्यूजेस हे त्यांचे सह-संस्थापक आहेत.
  • फेसबुकचे मुख्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे स्थित आहे. जानेवारी २०१८च्या आकडेवारीनुसार फेसबुकचे सुमारे २.२ अब्ज वापरकर्ते आहेत.

गुगलचे मेसेंजर अॅप ‘अल्लो’ बंद होणार

  • तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी गुगलने आपले मेसेंजर अॅप ‘अल्लो (Allo)’ बंद करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी या वर्षाच्या सुरूवातीस याहू मेसेंजरही बंद करण्यात आले होते.
  • मार्च २०१९पर्यंत हे ‘अल्लो’ अॅप पूर्णपणे बंद होईल, तोपर्यंत वापरकर्ते गुगल प्लसवरून आपला डेटा डाउनलोड करू शकतील.
  • वापरकर्त्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे अॅप बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.
  • याचवर्षी गुगलने आपला सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म गुगल प्लस बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे.
  • गुगलने अल्लोऐवजी अँड्रॉईड मेसेज आणि व्हिडिओ कॉलिंग अॅप ‘डुओ’वर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • गुगलने व्हॉट्सअॅप आणि ॲप्पलच्या iMessage अॅपशी स्पर्धा करण्यासाठी २१ सप्टेंबर २०१६ रोजी अल्लो हे अॅप इन्स्टंट मेसेजिंग अॅप सुरु केले होते.
  • हे गुगल क्रोम, मोझीला फायरफॉक्स आणि ओपेरा ब्राउझरशिवाय अँड्रॉईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर देखील कार्य करते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा