प्रश्नसंच १२५ - चालू घडामोडी

[प्र.१] गुजरात नंतर नुकतेच कोणत्या राज्याने मतदान सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला?
१] गुजरात
MT Quiz
२] महाराष्ट्र
३] मध्यप्रदेश
४] कर्नाटक
४] कर्नाटक
------------------
[प्र.२] “अॅट क्लोज ऑफ प्ले” हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे?
१] रिकी पॉटिंग
२] युवराज सिंग
३] केविन पीटरसन
४] अॅडम गिलख्रिस्त
१] रिकी पॉटिंग
------------------
[प्र.३] खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते गाव दत्तक घेतले आहे?
१] वडनगर (गुजरात)
२] जयापूर (उत्तर प्रदेश)
३] सायखेडा (महाराष्ट्र)
४] रामपूर (गुजरात)
२] जयापूर (उत्तर प्रदेश)
------------------
[प्र.४] भारताची मंगळ मोहीम कोणत्या देशातून नियंत्रित करण्यात आली होती?
१] रशिया
२] फ्रांस
३] फिजी
४] जपान 
३] फिजी
------------------
[प्र.५] महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत?
१] मोहित शहा
२] दयारास खंबाटा
३] पुरषोत्तम गायकवाड
४] सुनील मनोहर
४] सुनील मनोहर
------------------
[प्र.६] राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
१] रवींद्र वर्मा
२] नरेंद्र मोदी
३] अरुनेंद्र कुमार
४] राजनाथ सिंह
२] नरेंद्र मोदी
------------------
[प्र.७] नुकतेच चर्चेत आलेले जांगमू धरण कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
१] ब्रम्हपुत्रा
२] गंगा
३] सिंधू
४] झेलम
१] ब्रम्हपुत्रा
------------------
[प्र.८] नारळ पीक विमा योजना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे?
अ] नंदुरबार
ब] ठाणे
क] सिंधुदुर्ग
ड] कोल्हापूर

१] ब, क व ड बरोबर
२] अ, ब व क बरोबर
३] ब व क बरोबर
४] सर्व बरोबर
३] ब व क बरोबर
------------------
[प्र.९] भारताने २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत किती क्रीडाप्रकारात भाग घेतला होता?
१] ३४
२] २६
३] २८
४] ३१
३] २८
------------------
[प्र.१०] ईशान्य भारतातील लोकांवर दिल्लीसह देशभरात होत असलेल्या वांशिक हल्ल्यांविषयी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली?
१] मायाराम समिती
२] वर्मा समिती
३] बेझबरुआ समिती
४] शिवराज पाटील समिती
३] बेझबरुआ समिती
------------------
[प्र.११] व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राचे किती टक्के क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले?
१] १० टक्के
२] २० टक्के
३] ३० टक्के
४] ४० टक्के
३] ३० टक्के
------------------
[प्र.१२] प्रयोगासाठी प्रथम प्राण्यांवर वापर करून त्यानंतर बाजारात आणलेल्या सौंदर्य प्रसाधनांची (अॅनिमल टेस्टेड कॉस्मेटीक्स) आयात करण्यास बंदी आणणारा पहिला दक्षिण आशियातील देश कोणता?
१] भारत
२] मालदीव
३] सिंगापूर
४] इंडोनेशिया
१] भारत
------------------
[प्र.१३] ६ ते ९ नोव्हेंबर २०१४ रोजी ‘जागतिक आयुर्वेद परिषद ’ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
१] नवी दिल्ली
२] पुणे
३] हरिद्वार
४] शिलॉंग
१] नवी दिल्ली
------------------
[प्र.१४] ‘रूम्स’ नावाचे चॅटींग अप कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे?
१] गुगल
२] मायक्रोसॉफ्ट
३] याहू
४] फेसबुक
४] फेसबुक
------------------
[प्र.१५] खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
१] केंद्रीय मंत्रीमंडळातील सदस्य संख्या ६६ आहे.
२] केंद्रीय मंत्रीमंडळात महाराष्ट्राचे ७ मंत्री आहेत.
३] केंद्रीय मंत्रीमंडळात सर्वाधिक मंत्री उत्तर प्रदेश राज्यातून आहेत.
४] केंद्रीय मंत्रीमंडळात महिलांची संख्या ८ आहे.
२] केंद्रीय मंत्रीमंडळात महाराष्ट्राचे ७ मंत्री आहेत.
[केंद्रीय मंत्रीमंडळात महाराष्ट्राचे ६ मंत्री आहेत. १) नितीन गडकरी २) सुरेश प्रभू ३) अनंत गीते ४) पियुष गोयल ५) प्रकाश जावडेकर ६) हंसराज अहिर]


------------------

चालू घडामोडी - २६ फेब्रुवारी २०१५

·        २६ फेब्रुवारी १९६६ : थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी
·        सौर कृषिपंप वितरण :
·        केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय स्तरावर एक लाख सौर कृषिपंप वाटप करण्यात येणार
·        राज्यात हजार ५४० सौरऊर्जा पंपांचे वितरण करण्यात येणार असून, यासाठी सुमारे ४४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
·        राज्याच्या वाट्याची पाच टक्के रक्कम (२२ कोटी २५ लाख रुपये) हरित ऊर्जा निधीमधून देण्यात येणार आहे.
·        सुरवातीला या योजनेंतर्गत राज्यासाठी हजार ६०० सौर कृषिपंप वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे.
·        योजनेची अंमलबजावणीमहावितरणमार्फत करण्यात येईल. तसेच, महाऊर्जामार्फत तांत्रिक साह्य पुरविण्यात येईल.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  शेतकऱ्यांसाठी  शेतजमिनीचे आरोग्य सांभाळण्यासाठी व खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत बिघडू नये यासाठी मृदा स्वास्थ्य कार्ड (सॉईल हेल्थ कार्ड) योजना सुरु केली आहे.
·        सोशल नेटवर्किंगवर आत्महत्यांचे पोस्ट्‌स टाकून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी फेसबुकने पाऊल उचलले असून आता वापरकर्त्यांना अशा पोस्ट्‌स रिपोर्ट करण्याची व मदतीसाठी हेल्पलाईनला संपर्क करण्याची सुविधाही मिळणार आहे.
·        फेसबूक व ‘फोरफ्रंट : इनोव्हेशन इन सुसाइड प्रिव्हेंशन’ या वॉशिंग्टन विद्यापीठातील संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा तयार करण्यात आली आहे.
·        एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली एक कार घेऊन नाटोच्या अफगाणिस्तानातील एका प्रमुख अधिकाऱ्याच्या गाडीला धडक दिली. यामध्ये एक तुर्कीश सैनिक मारला गेला, तर एकजण जखमी झाला.
·        टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना ऑटोमोटिव्हRatan Tata इंजिनिअरिंग क्षेत्रात डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. दक्षिण कॅरोलिना येथे होणाऱ्या ऑटोमोटिव्ह शिखर परिषदेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
·        रतन टाटा यांनी १९६२ मध्ये टाटा समूहात प्रवेश केला होता. त्यानंतर १९८१ साली त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले होते.
·        कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून आर्किटेक्चरची पदवी मिळवल्यानंतर टाटा यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्यवस्थापन (अॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम) क्षेत्रात उच्चशिक्षण घेतले आहे.
·        भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मे पासून कोणताही क्रमांक कोणत्याही सेवापुरवठादाराकडे हस्तांतरिक करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे भारतातील मोबाईलधारकांना मोबाईल क्रमांक न बदलता कोणत्याही सेवा पुरवठादारांकडे हस्तांतरित करता येणे शक्‍य होणार आहे.
·        यापूर्वी एखादा क्रमांक अन्य सेवापुरवठादाराकडे हस्तांतरित करण्यासाठी मर्यादा होत्या. मूळ सेवापुरवठादाराच्या सेवा ज्या परिक्षेत्रात उपलब्ध आहेत तेथेच मोबाईल क्रमांक अन्य सेवापुरवठादारांकडे हस्तांतरीत करता येणे शक्‍य होते.
·        मात्र. ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार कोणताही ग्राहक कोणत्याही सेवापुरवठादाराकडील कोणताही क्रमांक भारतातील कोणत्याही ठिकाणी अन्य सेवापुरवठादारांकडे हस्तांतरित करू शकेल.
·        चारशे युनिटपर्यंत वीज वापरावर पन्नास टक्के दरकपात करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा थेट फायदा ९० टक्के दिल्लीकरांना होणार आहे.
·        बिल्डर प्रदीप जैन यांच्या खून प्रकरणातील दोषी कुख्यात गुन्हेगार अबू सालेम आणि मेहंदी हसन यांना विशेष ‘टाडा’ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
·        सालेमने दुबईत असताना १९९५ मध्ये जैन यांची हत्या घडवून आणली होती.
·        भ्रष्टाचारासंदर्भातील प्रकरणांच्या सुनावणीसाठी उपस्थित न राहिल्याने बांगला देशमधील न्यायालयाने विरोधी पक्ष नेत्या बेगम खालिदा झिया यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले आहे.
·        मेक इन इंडियाच्या धर्तीवर व्हिडीओकॉन कंपनीने भारतातील पहिल्या वहिल्या वायफाय एसीची निर्मिती केली आहे.
·        महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमानुसार विद्यापीठाच्या कुलगुरूचे पद रिक्त झाल्यापासून १२ महिन्यांसाठी प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात येत होती.
·        या अधिनियमात दुरुस्ती केल्यामुळे हा कालावधी आता १२ महिन्यांवरून १८ महिन्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
·        पुण्याजवळ झालेल्या सुखोई विमानाच्या अपघाताला मानवी चूक कारणीभूत होती, असा दावा सुखोई विमानाची मूळ रशियन उत्पादक असलेल्या इर्कुट कॉर्पोरेशन कंपनीने केला आहे.
·        इर्कुट कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष (लष्करी विक्री) - विटाली बोरोडिच
·        आयसीसीने विश्वपकरंडक स्पर्धेसाठी खेळाडूंसाठी लागू केलेल्या आचारसंहितेनुसार खेळाडूंनी रात्री दहाच्या आत आपल्या रुममध्ये असणे बंधनकारक आहे.
·        या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेशिस्त वर्तनाबद्दल बांगलादेश संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज अल अमिन हुसेन याला घरी पाठवून दिले आहे. त्याच्याऐवजी शफीऊल इस्लाम याला संघात स्थान देण्यात आले. आहे.

चालू घडामोडी - २५ फेब्रुवारी २०१५

·        १४व्या वित्त आयोगाचा अहवालाच्या शिफारशी
Y. V. Reddy
·        अध्यक्ष:-रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी
·        केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा १० टक्क्यांनी वाढवून ४२ टक्के
·        २०१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यांना १.७८ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल (केंद्राकडून)
·        महसुलाची चणचण असलेल्या ११ राज्यांना ४८,९०६ कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची शिफारस
·        आंध्र प्रदेश (तेलंगणच्या विभाजनानंतर), आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅंड, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल चा या राज्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
·        २०२० पर्यंत एकूण १.९४ लाख कोटींचा निधी केंद्राकडून अदा 
·        २०१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यांना एकूण ५.२६ लाख कोटी रुपयांचा वाटा
·        २०१९-२० सालापर्यंत राज्यांचा एकूण महसुली वाटा ३९.४८ लाख कोटींचा असेल.
·        पाच वर्षांत पंचायती आणि महानगरपालिकांसाठी २.८७ लाख कोटींचा अतिरिक्त निधी केंद्राकडून मिळेल.
·        याशिवाय आपत्ती निवारणासाठी सर्व राज्यांसाठी ५५,०९७ कोटी रुपयांचा निधी
·        मंगळ ग्रहावरील ‘मोजावे’ या ठिकाणी नमुने गोळा करणाऱ्या क्‍युरिऑसिटी रोव्हर या अमेरिकेची संशोधन संस्था असलेल्या नासाच्या अवकाशयानाने एक ‘सेल्फी’ छायाचित्र काढले आहे.
·        या छायाचित्रामध्ये क्‍युरिऑसिटी रोव्हर गेल्या पाच महिन्यांपासून काम करत असलेल्या ‘पहरुंप हिल्स’ भागाचे दृश्‍यही दिसत आहे.
·        रामनिवास गोयल (आप - शाहदरा) यांची दिल्ली चे ६वे विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
·        विधानसभा उपाध्यक्ष: वंदना कुमारी (शालीमार बाग)
·        राज्यसभेच्या विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे.आझाद यांची राज्यसभेवर निवडून येण्याची ही पाचवी वेळ आहे.ते राज्यसभेवर जम्मू-काश्मीर मधून निवडून आले आहेत.
·        नवीन राज्य सरकारचे पहिले अर्थसंकल्पी अधिवेशन ९ मार्चपासून सुरू होत असून, १८ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे.
·        जम्मू-काश्‍मीरमधील पीडीपी-भाजप आघाडी सरकारच्या स्थापनेला अखेर मुहूर्त मिळाला असून, मार्च रोजी मुफ्ती महंमद सईद मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
·        जम्मू-काश्‍मीरसंबंधीचे कलम ३७० आणि लष्करी विशेषाधिकार कायदा अशा अनेकविध बाबींवरून असलेले मतभेद मिटविण्यात दोन्ही पक्षांना यश आले आहे.
·        भाजपचे निर्मलसिंह यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.
·        साम्यवादी विचार असलेल्या पक्षाच्या धोरणाविरुद्ध तसेच पक्षप्रमुखाविरुद्ध ऑनलाईन निबंधाद्वारे लेखन केल्याबद्दल चीनमधील ८१ वर्षाच्या लेखकाला चीनच्या न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, कोणत्याही कायद्याचा भंग न करता तुरुंगाच्या बाहेर राहण्याची अनुमतीही न्यायालयाने दिली आहे.
·        हुआंग झेरॉंग ऊर्फ टाय लियु असे लेखकाचे नाव आहे.
·        देशात संपर्काचे जाळे उभारण्यात साह्यकारी ठरणाऱ्या ११ उपग्रहांसह एकूण २७ उपग्रह सध्या कार्यरत आहेत. तसेच, पुढील महिन्यात आणखी एक उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे, अशी माहिती लोकसभेमध्ये देण्यात आली.
·        संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा समितीमध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळण्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले आहे.
·        अमेरिकेने तब्बल दोन दशकांपेक्षा जास्त काळानंतर सोमालिया या आफ्रिकेतील देशासाठी राजदूत नेमण्याची घोषणा केली आहे.
·        ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी असलेल्या कॅथरीन धनानी यांची नेमणूक सोमालियामधील अमेरिकेच्या राजदूतपदी करण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतला आहे.
·        ओबामांच्या या निर्णयासाठी सिनेटची संमती आवश्‍यक आहे. आफ्रिकेतील राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या धनानी या सोमालियामध्ये १९९१ नंतर नेमल्या जाणाऱ्या प्रथम अमेरिकन राजदूत असतील.
·        गुगल या लोकप्रिय सर्च इंजिनने २३ मार्च पासून आपल्या ब्लॉगिंग सेवेवर अश्‍लिल मजकूर प्रकाशित करण्यास बंदी केली आहे.
·        याबाबत गुगलने अधिकृत घोषणा केली आहे. तसेच सर्व ब्लॉगर्सना याबाबत -मेलद्वारे माहिती दिली आहे. गुगलच्या या निर्णयाचे बहुतेक ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.
·        बांगड्या भरण्याचा व्यवसाय करणाऱ्या गरीब महिलेचा मुलगा ते भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असा प्रवास करणारे रमेश घोलप यांच्या जीवनातील संघर्षाची कहाणी लवकरच चित्रपटातून पाहण्यास मिळणार आहे.
·        काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या इथे थांबणे नाही या घोलप यांच्या पुस्तकाला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
·        जिल्हा न्यायालयात आर्थिक अपील करण्याची मर्यादा १० लाख रुपयांवरून १ कोटी रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.