चालू घडामोडी : १७ ऑगस्ट

महाराष्ट्रात राबविण्यात येणार पोषण अभियान

  • कुपोषणापासून बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि जन्मत: कमी वजन असणाऱ्या बालकांची संख्या खाली आणण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत नवीन पोषण अभियान महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.
  • राज्यात ९७ हजार अंगणवाड्या असून त्यापैकी ८५,४५२ अंगणवाड्यांमधून ही योजना राबविण्यात येणार असून यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
  • अंगणवाड्यांमधील ० ते ६ वयोगटाच्या बालकांमधील खुजेपण तसेच कुपोषणाचे प्रमाण ६ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • तसेच ६ ते ९ महिने वयाच्या बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ९ टक्क्यांवरून ३ टक्के एवढे खाली आणणे जन्मत: वजन कमी असणाऱ्या बालकांचे प्रमाण २ टक्क्यांवर आणणे हे देखील या योजनेचे ध्येय आहे.
  • २०१८-१९ या वर्षात दोन टप्प्यांत ३० जिल्ह्यातील ८५,४५२ अंगणवाड्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. २०१९-२०मध्ये उर्वरित ६ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येईल.
  • या योजनेसाठी केंद्र शासन ८० टक्के तर राज्य शासन २० टक्के खर्च करणार असून एकूण योजनेची व्याप्ती ही २४७ कोटी रुपये एवढी आहे.
  • राज्यात २.०७ लाख अंगणवाडी सेविका व कर्मचारी काम करत असून, सुमारे ७३ लाख बालकांना पोषण आहार देण्याबरोबरच या बालकांचे नियमित वजन करणे तसेच सबलीकरणासह आरोग्याची काळजी घेण्याचे काम ते करत असतात.
  • या कामाप्रमाणेच बालकांच्या नेमक्या उपस्थितीचे प्रमाणीकरण करण्यासाठी या नव्या योजनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • यासाठी अंगणवाडी सेविकांसाठी ८९ हजार अत्याधुनिक मोबाइल घेण्यात येणार आहेत. या मोबाइलद्वारे बालकांना देण्यात येणाऱ्या रोजच्या आहाराचे छायाचित्र काढण्याबरोबर या बालकांची नोंदणी आधारशी जोडण्यात येणार आहे.
  • यासाठी राज्य पातळीवर व गटपातळीवर दोन समित्या करण्यात आल्या असून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक व विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०१८मध्ये पोषण अभियानाची सुरुवात राजस्थानमधील झुनझुनू येथे केली. यापूर्वी या योजनेचे नाव राष्ट्रीय पोषण मिशन असे होते.
  • गर्भवती महिला, माता आणि बालकांसाठी समग्र विकास आणि पुरेसे पोषण सुनिश्चित करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • POSHAN : Prime Minister’s Overarching Scheme for Holistic Nutrition
  • घोषवाक्य :सही पोषण - देश रोशन

इसोव अल्बानला सायकलिंगमध्ये रौप्यपदक

  • स्वित्झर्लंड येथे सुरु असलेल्या ज्यूनियर ट्रॅक सायकलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत केइरीन प्रकारात अंदमान-निकोबार बेटावरील इसोव अल्बान या युवा खेळाडूने रौप्यपदक जिंकले.
  • जागतिक स्तरावरील महत्वाच्या स्पर्धेत ट्रॅक सायकलिंगमध्ये भारताला मिळालेले हे पहिले पदक आहे.
  • इसोवचे सुवर्णपदक फक्त ०.०१७ सेकंदाच्या फरकाने हुकले. झेक प्रजासत्ताकच्या जाकूब स्टॅस्टनीने सुवर्णपदक व कझाकस्तानच्या अँड्री चूगायने कांस्यपदक जिंकले.
  • इसोव एक प्रतिभावान सायकलपटू आहे. ज्यूनियर स्प्रिंट सायकलपटूंमध्ये तो पहिल्या स्थानावर आहे.
  • मलेशियात पार पडलेल्या आशियाई ट्रॅक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने ३ सुवर्णपदकेपटकावली होती.
  • जुलै २०१८मध्ये युवा धावपटू हिमा दासने आयएएएफ वर्ल्ड अंडर २० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये ४०० मीटर शर्यातील सुवर्णपदक पटकात इतिहास रचला होता. ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी ती पहिला भारतीय महिला आहे.

पाकिस्तानचा फलंदाज नासिर जमशेदवर १० वर्षांची बंदी

  • पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेत स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याप्रकरणी पाकिस्तानचा फलंदाज नासिर जमशेदवर १० वर्षांची बंदी घालण्यात आली.
  • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्थापन केलेल्या चौकशी समितीत नासिर जमशेद दोषी आढळला होता, यानंतर समितीने दिलेल्या निकालानुसार जमशेदला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
  • नासिर पुढची १० वर्ष पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकणार नाही, याचसोबत आयुष्यभरासाठी नासिर पाकिस्तान क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचे पदही भूषवु शकणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा