गगनयान मोहिमेची धुरा डॉ. व्ही आर ललिथंबिका यांच्याकडे
अंतराळवीरासह अवकाशात उपग्रह पाठविण्यासाठीच्या गगनयान या मोहिमेची धुरा इस्रोच्या डॉ. व्ही आर ललिथंबिका यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी म्हणजेच २०२२मध्ये अवकाशात अंतराळवीरासह उपग्रह पाठविणार असल्याची घोषणा १५ ऑगस्ट रोजी दिलेल्या भाषणात केली होती.
गगनयान मोहिमेसाठी डॉ. ललिथंबिका त्यांच्यासोबत काम करणाऱ्या चमूची लवकरच निवड करणार असून कामाची आखणीही करणार आहेत.
गगनयान मोहिमेअंतर्गत पाठविण्यात येणार अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असेल, या प्रकल्पासाठी १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या प्रकल्पामध्ये विविध संघटना, तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील मंडळी सहभागी असतील. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती होणार आहे.
ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे.
गगनयान मोहिमेपूर्वी जीएसएलव्ही-३च्या आधारे दोन मानवरहित मोहिमा हाती घेण्यात येणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.
इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन
भारताच्या रणगाडाविरोधी हेलिना क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारताने १९ ऑगस्ट रोजी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये हेलिकॉप्टरवरून डागता येणाऱ्या रणगाडाविरोधी हेलिना या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
त्याचवेळी जैसमलेरच्या चंदन रेंजवर भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानातून गाईडेड बॉम्बची (स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन - SAAW) घेण्यात आलेली चाचणीही यशस्वी ठरली.
चीन आणि पाकिस्तान यांच्याविरोधात ही दोन्ही शस्त्रे मोक्याच्या क्षणी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. या दोघांनाही डीआरडीओने विकसित केले आहे.
हेलिना हे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र असून त्यामुळे भारताची संरक्षण दलांची क्षमता अनेक पटींने वाढणार आहे.
हेलिना क्षेपणास्त्रामधील इन्फ्रारेड इमेजिंग सीकर या सिस्टिमने लक्ष्यभेदासाठी मार्गदर्शन केले. सध्याच्या घडीला हे जगातील सर्वात अत्याधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे.
स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन (SAAW) या गाईडेड मिसाईलची निर्मितीही पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरुन या करण्यात आली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ – दुसरा दिवस
नेमबाजी
१० मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या दिपक कुमारने २४७.७ गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली.
पात्रता भेरीत भारताच्या रवी कुमार आणि दिपक कुमार यांनी आश्वासक खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
परंतु मोक्याच्या क्षणी अपेक्षित कामगिरी न करता आल्यामुळे रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीत नेमबाजपटू लक्ष्य शेरॉन याने सुरेख कामगिरी करताना रौप्यपदक मिळवले. मात्र, त्याचे सुवर्णपदकाचे लक्ष्य फक्त ५ गुणांनी हुकले.
४३ गुणांसह लक्ष्यने रौप्यपदक पटकावले, तर सुवर्णपदक जिंकणाऱ्या चायनीज तैपईच्या कुन्पी यांगने ४८ गुणांची कमाई केली. दक्षिण कोरियाच्या देमयांग अहनने ३० गुणांसह कांस्यपदक मिळवले.
भारताच्या मानवजीत सिंह संधूने ट्रॅप नेमबाजीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र पदक जिंकण्यात त्याला अपयश आले.
कुस्ती
महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने जपानच्या युकी आईरीवर मात करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
या विजयासह विनेश आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.
भारतासाठी हे आतापर्यंतचे दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी पहिल्या दिवशी कुस्तीत भारताला बजरंग पुनियाने सुवर्णपदक मिळवून दिले होते.
विनेशची आतापर्यंतची आशियाई स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी विनेशला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले होते.
विनेशने गोल्डकोस्ट ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते.
जलतरण
भारतीय जलतरणपटूसाजन प्रकाशया भारतीय जलतरणपटूने आशियाई क्रीडा स्पर्धेत जवळपास३२ वर्षांनंतर २०० मी बटरफ्लाय स्विमिंग प्रकारात भारताची मोहोरउमटली.
१९८६मध्ये खजान सिंगनंतर २०० मी बटरफ्लाय प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या साजनने अंतिम फेरीमध्ये पाचवे स्थान मिळविले.
विजेतेपदाने त्याला हुलकावणी दिली असली तरीही त्याच्या एकंदर प्रदर्शनामुळे देशभर त्याची चर्चा झाली.
सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा पराभव करीत एटीपी सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेतील पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
या विजयाबरोबरच जोकोविचने सर्वच्या सर्व नऊ ‘मास्टर्स १०००’ स्पर्धा जिंकण्याचा विक्रमही आपल्या नावावर नोंदवला आहे.
१९९०पासून सुरु झालेल्या मास्टर्स प्रकारातील सर्व स्पर्धा जिंकणारा जोकोविच हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
जागतिक क्रमवारीमध्ये १०व्या क्रमांकावर असणाऱ्या जोकोविचने जागतिक क्रमावारीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या फेडररचा ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.
महिला एकेरीमध्ये किकि बर्टेंस हिने सिमोना हालेपला पराभवाचा धक्का देत एटीपी सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद आपल्या नावावर केले. किकिने सिमोनाचा २-६, ७-६, ६-२ असा पराभव केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा