चालू घडामोडी : २५ ऑगस्ट

भारत-पाकिस्तान सैन्याचा पहिल्यांदाच संयुक्त युद्धसराव

  • रशियातील चेबर्कुल येथे ‘शांतता मिशन २०१८’ अंतर्गत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये (एससीओ) सहभागी असलेल्या सर्व देशांचा संयुक्त युध्दसराव २४ ऑगस्ट रोजी सुरु झाला.
  • यामध्ये सीमा रेषेवरील तणावपूर्ण वातावरणात एकमेकांसमोर उभे ठाकणाऱ्या आणि एससीओचे सदस्य असलेल्या भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने पहिल्यांदाच संयुक्त सराव केला.
  • दहशतवादविरोधी कारवायांना प्रत्युत्तर देण्याचे प्रशिक्षण देण्यसाठी या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ६ दिवसांचा सराव २९ ऑगस्टपर्यंत असेल.
  • या प्रशिक्षणादरम्यान, औपचारिक चर्चा, कारवाईदरम्यान आपापसातील ताळमेळ, संयुक्त कमांडची स्थापना, कंट्रोल स्ट्रक्चर आणि दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्याबाबतच्या मॉक ड्रिलसारखा अभ्यास करण्यात येणार आहे.
  • यात रशियाचे १७००, चीनचे ७००, भारताचे २००, पाकिस्तानचे ११० सैनिक सहभागी झाले आहेत. यात भारताच्या राजपूत रेजिमेंट आणि हवाई दलाच्या जवानांचा समावेश आहे.
  • दहशतवादाविरोधाच्या लढ्यातील आधुनिक तंत्र आणि इतर क्‍लुप्त्या शिकण्याची संधी या सरावातून मिळणार आहे.
 शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन 
  • शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) स्थापना २००१मध्ये चीनच्या पुढाकाराने करण्यात आली.
  • चीन, कझाकस्तान, किर्गीझस्तान, उझबेकिस्तान, ताजिकीस्तान आणि रशिया हे या संघटनेचे संस्थापक देश आहेत.
  • या देशांपैकी उझबेकिस्तान वगळता इतर देश १९९६मध्ये स्थापन झालेल्या ‘शांघाय फाइव्ह’ या गटाचे सदस्य होते.
  • २०१७मध्ये भारत व पाकिस्तानला या संघटनेचे पूर्ण सदस्यत्व देण्यात आल्यामुळे सध्या या संघटनेचे ८ सदस्य देश आहेत.
  • हे ८ देश जगातील ४२ टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. या देशांचे उत्पन्न हे जागतिक उत्पन्नाच्या २० टक्के आहे.
  • अफगाणिस्तान, बेलारूस, इराण व मंगोलिया हे ‘एससीओ’शी निरीक्षक देश म्हणून संलग्न आहेत.
  • दहशतवाद, फुटीरतावाद आणि टोकाची भूमिका या ३ समस्यांविरोधात लढण्यासाठी आणि उपखंडीय समृद्धीसाठी यंत्रणा निर्माण करण्याकरिता शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) स्थापन झाली.
  • मूलतत्त्ववाद व दहशतवाद या समस्यांबरोबरच व्यापार, गुंतवणूक व दळणवळण तसेच संपर्क या मुद्द्यांवर या संस्थेच्या माध्यमातून बदल घडून येणे अपेक्षित आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८: सातवा दिवस

  • गोळाफेक: तजिंदर पाल सिंग तूरला सुवर्णपदक
  • भारताच्या गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग तूर याने २०.७५ मीटरची विक्रमी फेक करत गोळाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदकाची कमाई करून दिली.
  • पंजाबमधील मोगा गावचा रहिवासी असलेल्या तूरने ओमप्रकाश करहानाच्या नावे असलेल्या २०.६९ मीटर गोळाफेकीचा सहा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
  • चीनच्या लियू येंगने १९.५२ मीटर गोळा फेकत रौप्य, तर कझागस्तानच्या इवान इवानोव्हने कांस्य पदक पटकावले.
  • २०१७मध्ये भुवनेश्वर येथे पार पडलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप्स स्पर्धेत तूरने सुवर्ण पदकाची कमाई केली होती.
  • २०१७च्या आशियाई इनडोअर अजिंक्यपद स्पर्धेत तूरने १९.७७ मीटरसह रौप्यपदक जिंकले होते. अवघ्या ०.०३ मीटरने त्याचे सुवर्णपदक हुकले होते.
  • ५७व्या राष्ट्रीय आंतरराज्यीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप्स २०१८ या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते. तूर सध्या आशियाईतील अव्वल स्थानी विराजमान आहे.
  • स्क्वॉश: दिपीका पल्लिकल, जोशना चिनप्पा, सौरव घोषाल यांना कांस्यपदक
  • स्क्वॉशमध्ये भारताच्या दिपीका पल्लिकल आणि जोशना चिनप्पा यांनी महिला एकेरीमध्ये तर सौरव घोषालने पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक जिंकले. भारताने स्क्वॉशच्या एकेरीत एका एशियाडमध्ये प्रथमच तीन पदके पटकावली.
  • दिपीका पल्लिकलला उपांत्य सामन्यात मलेशियाच्या निकोल अॅन डेव्हिडकडून पराभव पत्करावा लागला. दिपीकाचे आशियाई खेळांमधील हे चौथे पदक ठरले.
  • आशियाई खेळांच्या २०१०मधील कांस्यविजेत्या आणि २०१४मधील रौप्यविजेत्या संघात दीपिकाचा समावेश होता. तसेच, २०१४ एशियाडमध्ये दीपिकाने एकेरीत कांस्यपदक मिळविले होते.
  • दुसऱ्या उपांत्य सामन्यात जोशना चिनप्पाचा मलेशियाच्या सिवासंगरी सुब्रमण्यमने पराभव केल्यामुळे तिलाही कांस्यपदकावर समाधान मानवे लागले.
  • कांस्यपदकासाठी अतिरिक्त सामना नसल्यामुळे उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही खेळाडूंना कांस्यपदक दिले जाते.
  • आशियाई स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला स्क्वॉशपटूंनी एकेरीत दोन पदक जिंकण्याचा पराक्रम केला.
  • मागील आशियाई क्रीडा स्पर्धेचा रौप्यपदक विजेता सौरव घोषालला हाँगकाँगच्या च्यूंग मिंग ऊ पराभूत केल्यामुळे त्यालाही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • सौरव घोषालचे आशियाई स्पर्धांमधील हे सहावे पदक ठरले. त्याने २००६ आणि २०१०मध्ये एकेरीचे कांस्य आणि २०१४मध्ये एकेरीचे रौप्यपदक मिळविले होते.
  • तसेच, २०१४मध्ये सुवर्णविजेत्या भारतीय संघात; तसेच २०१०मध्ये कांस्यविजेत्या भारतीय संघांत सौरवचा समावेश होता.

नौदलासाठी लष्करी सामग्री खरेदी प्रस्तावाला मंजुरी

  • संरक्षण मंत्रालयाने नौदलासाठी ४६ हजार कोटी रुपयांच्या लष्करी सामग्री खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
  • संरक्षण अधिग्रहण परिषदेतच्या (डीएसी) बैठकीत घेण्यात आला. डीएसी ही लष्कराशी संबंधित खरेदीबाबत निर्णय घेणारी सर्वात मोठी संस्था आहे.
  • याद्वारे नौदलासाठी १११ बहुउद्देशीय हेलिकॉप्टर, तसेच सुमारे १५० आर्टिलरी गनखरेदी केली जाणार आहे.
  • यापैकी १११ हेलिकॉप्टर खरेदी करारावर २१ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. धोरणात्मक भागीदारीअंतर्गत संरक्षण मंत्रालयाचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा उद्देश ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला चालना देणे हा आहे.
  • या खरेदी व्यवहारामधून लष्करासाठी १५५ मिमीच्या १५० आर्टिलरी गन खरेदी करण्यात येतील. यासाठी ३,३६४ कोटी रक्कम खर्च करण्यात येईल.
  • डिफेन्स आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (डीआरडीओ) या गन भारतातच डिझाइन आणि विकसित केल्या जातील.
  • तसेच १४ व्हर्टिकल लॉन्च होणारी शॉर्ट रेंज मिसाईल प्रणाली खरेदी करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन

  • ऑस्ट्रेलियाच्या लिबरल पक्षामध्ये पंतप्रधान माल्कम टर्नबल यांच्याविरोधात बंड झाल्यानंतर, पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन यांची निवड करण्यात आली आहे.
  • पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीमध्ये मॉरिसन यांनी माजी गृहमंत्री पीटर डटन यांचा पराभव केला. ऑस्ट्रेलियात गेल्या ११ वर्षात ६ पंतप्रधानाची निवड झाली आहे.
  • टर्नबल यांनी गेल्या आठवड्यामध्ये उर्जा कपातीसाठी एक ठराव आणला होता. यामध्ये विजेचे दर कमी करतानाच, हवामान बदलाला तोंड देण्यासाठी कार्बन उत्सर्जनामध्ये कपात करण्याचे उपाय होते.
  • त्यावरून पक्षामध्ये त्यांच्याविरोधात बंड झाले आणि बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी त्यांच्याऐवजी अन्य नेत्याची निवड करण्याचे निवेदन दिले होते. त्यानंतर टर्नबल यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
  • ऑस्ट्रेलियामध्ये काही महिन्यांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असून, त्यामध्ये मॉरिसन पक्षाचे नेतृत्व करणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा