चालू घडामोडी : १९ ऑगस्ट

११व्या विश्व हिंदी सम्मेलनाला मॉरिशसमध्ये सुरुवात

  • जगभरात हिंदी भाषेचा प्रसार व्हावा यासाठी आयोजित ११व्या विश्व हिंदी सम्मेलनाला १८ ऑगस्टपासून मॉरिशसची राजधानी पोर्ट लुई येथे सुरुवात झाली.
  • या सम्मेलनाचे आयोजन भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाद्वारे मॉरीशस सरकारच्या सहयोगाने करण्यात येत आहे.
  • या सम्मेलनाच्या आयोजनाचा निर्णय सप्टेंबर २०१५मध्ये भोपाळ येथे आयोजित १०व्या विश्व हिंदी सम्मेलनामध्ये घेण्यात आला होता.
  • हे सम्मेलन ३ दिवस (१८ ते २० ऑगस्ट) चालणार आहे. या सम्मेलनात विविध हिंदी आणि भारतीय संस्कृतीवरील ८ विषयांवर चर्चा होणार आहे.
  • या सम्मेलनाचे आयोजन मॉरिशसमधील स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय सभा केंद्रात करण्यात आले असून, या सम्मेलनाचा मुख्य विषय ‘हिंदी विश्‍व आणि भारतीय संस्‍कृती’ हा आहे.
  • परंपरेनुसार या सम्मेलनादरम्यान भारत तसेच इतर देशांच्या हिंदी विद्वानांना त्यांनी हिंदी भाषेच्या क्षेत्रातील विशेष योगदानासाठी ‘विश्व हिंदी सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे.
  • या सम्मेलनात नुकतेच निधन झालेले भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
  • याशिवाय मॉरीशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ यांनी ज्या सायबर टॉवरच्या निर्मीतीमध्ये वाजपेयींनी सहकार्य केलं होते, त्या सायबर टॉवरला अटल बिहारी वाजपेयी नाव देण्याची घोषणाही केली.
 विश्‍व हिंदी सम्मेलन 
  • विश्‍व हिंदी सम्मेलन हिंदी भाषेतील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय सम्मेलन आहे. १९७५पासून विश्व हिंदी संम्मेलनाचे आयोजन केले जात आहे.
  • यामध्ये जगातील हिंदी विचारवंत, साहित्यकार, पत्रकार, भाषा वैज्ञानिक तसेच हिंदी प्रेमी या संम्मेलनात सहभागी होत असतात.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी, तसेच हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी विश्‍व हिंदी सम्मेलनाचे आयोजन करण्यात येते.
  • सुरुवातील प्रत्येक ४ वर्षांनी या सम्मेलनाचे आयोजन केले जात असे. पुढे हा कालावधी ३ वर्षांपर्यंत कमी करण्यात आला.
  • पहिले विश्‍व हिंदी संम्मेलन नागपूर येथे पार पडले. तेव्हापासूनच १० जानेवारी जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • यापूर्वीचे १०वे जागतिक हिंदी संम्मेलन भारतातील मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ येथे पार पडले या संम्मेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
आत्तापर्यंत आयोजित विश्व हिंदी संम्मेलने
संम्मेलन ठिकाण वर्ष
पहिले नागपूर, भारत जानेवरी १९७५
दुसरे पोर्ट लुई, मॉरिशस ऑगस्ट १९७६
तिसरे नवी दिल्ली, भारत ऑक्टोबर १९८३
चौथे पोर्ट लुई, मॉरिशस डिसेंबर १९९३
पाचवे पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो एप्रिल १९९६
सहावे लंडन, ब्रिटन सप्टेंबर १९९९
सातवे परामारिबो, सूरीनाम जून २००३
आठवे न्यूयॉर्क, अमेरिका जुलै २००७
नववे जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका सप्टेंबर २०१२
दहावे भोपाळ, भारत सप्टेंबर २०१५
अकरावे पोर्ट लुई, मॉरिशस ऑगस्ट २०१८

निधन : ज्येष्ठ विचारवंत व लेखक प्रा. फकरूद्दिन बेन्नूर

  • महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते, चिंतनशील लेखक व ज्येष्ठ विचारवंत प्रा. फकरूद्दिन बेन्नूर यांचे वयाच्या ८०व्या वर्षी १७ ऑगस्ट रोजी मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले.
  • बेन्नूर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३८ रोजी साताऱ्यामध्ये झाला. त्यांनी राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयांमध्ये एमए पदवी संपादन केली होती.
  • बागवान या मुस्लीम ओबीसी समाजात जन्मलेले प्रा. बेन्नूर हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे कट्टर समर्थक, सामाजिक सौहार्दाचे सच्चे पुरस्कर्ते आणि विवेकवादी होते. मात्र कधीही कोणतीही वैचारिक गुलामगिरी त्यांनी पत्करली नाही.
  • त्यांनी सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून १९६६पासून १९९८पर्यंत काम केले. निवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात सक्रिय होते.
  • हिंदू-मुस्लीम प्रश्न, मुस्लीम राजकारण, सामाजिक सौहार्द, महात्मा गांधी, कार्ल मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विषयांवर १५०हून अधिक शोधनिबंध त्यांनी सादर केले होते.
  • दैनिक संचार, सोलापूर समाचार, समाज प्रबोधन पत्रिका, अक्षरगाथा, परिवर्तनाचा वाटसरू, सत्याग्रही विचारधारा इत्यादी नियतकालिकांत त्यांनी लेखन केले.
  • मुस्लिम समाजातील अभ्यासू आणि बुद्धिवंत समाजसुधारकांमध्ये बेन्नूर यांचे नाव आदराने घेतले जाते. मुस्लिम विचारवंत व राजकीय विश्लेषक म्हणून ते ओळखले जातात.
  • समाजात वाढलेला जमातवाद, वाईट रूढी-परंपरा, हिंदुत्ववाद आदी विषयांवर त्यांनी १९६८पासून सातत्याने लिखाण केले. सोलापूरमधील कामगार चळवळ तसेच डाव्या चळवळीतही त्यांनी दीर्घ काळ काम केले.
  • १९८९मध्ये मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना करून मराठी साहित्य चळवळीला प्रोत्साहन दिले.
  • १९९२ साली त्यांनी महाराष्ट्र मुस्लिम ओबीसी संघटना स्थापन करून मुस्लिमांच्या प्रश्नांवर आवाज उठवला.
  • १९७०पासून त्यांनी सुधारणावादी चळवळीसाठी कामाला सुरुवात केली. बेन्नूर यांनी असगरअली इंजिनियर आणि डॉ. मोईन शाकीर यांच्यासोबत काम केले.
  • २०१४मध्ये त्यांनी इतिहास पुनर्लेखन समितीची स्थापना केली. तसेच त्यांनी डॉ. आंबेडकर अकादमीची स्थापनाही केली होती.
  • मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात महाराष्ट्रीयन मुस्लीम अधिकार आंदोलनाची सुरूवात केली.
  • मुस्लिम महिलांचे प्रश्न, हिंदु-मुस्लिम प्रश्न आणि राजकारण, जमातवाद, हिंदु-मुस्लिम सौहार्दाची समस्या आदी विषयांवर त्यांनी विविध वृत्तपत्रे, पाक्षिके, मासिके आणि साप्ताहिकांत लेखन केले आहे.
  • भारतीय मुसलमान, इस्लाम व भारतातील धार्मिक हिंसाचार या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांची मराठी, हिंदी आणि उर्दूत मिळून १०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
  • प्रा. फकरुद्दीन बेन्नूर हे महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळीत काम करणारे सक्रिय कार्यकर्ते होते.
  • त्यांच्या कार्याबद्दल त्यांना छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच त्यांच्या हिंदुत्व, मुस्लिम आणि वास्तव या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा डॉ. सूर्यकांत घुगरे पुरस्कार प्राप्त झाला आहे.
 प्रा. बेन्नूर यांच्या साहित्यकृती 
  • भारतीय मुसलमानोंकी मानसिकता और सामाजिक संरचना (१९९८)
  • हिंदुत्त्व, मुस्लीम आणि वास्तव (२००७)
  • गुलमोहर (कविता संग्रह २०१०)
  • सुफी संप्रदाय : वाङमय, विचार आणि कार्य (२०१६)
  • भारत के मुस्लीम विचारक (२०१८)
  • हिंद स्वराज्य : एक अन्वयार्थ (२०१८)
  • मुस्लीम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद (२०१८)
  • भारत के मुसलमानो की मशिअत और जेहनियत (उर्दू २०१८)
  • मुस्लीम मराठी साहित्य : एक दृष्टिक्षेप (२०१८)
  • भारतीय मुस्लीम अपेक्षा आणि वास्तव
  • राष्ट्रवाद, सामाज्यवाद आणि इस्लाम (२०१८)
  • मुस्लिम समाज : अपेक्षा आणि वास्तव (२०१८)
  • भारतीय मुसलमानांचे राजकारण (२०१८)

आशियाई क्रीडा स्पर्धा – पहिला दिवस

  • नेमबाजी सांघिक
  • भारतीय नेमबाजपटू अपुर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने १० मी. एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली.
  • यंदाच्या एशियाडमधले भारताचे हे पहिले पदक ठरले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत ४२९.९ गुणांची कमाई केली. चीनच्या तैपेई संघाने ४९४.१ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.
  • अंतिम फेरीत कोरिया, मंगोलिया यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांची कडवी झुंज मोडून काढत भारतीय जोडीने कांस्यपदकाची कमाई केली आहे
  • कुस्ती
  • भारताच्या बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८ असे पराभूत करत भारताला यंदाचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
  • हा विजय आणि आपले पदक बजरंगने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले.

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाचे ऑपरेशन मदद

  • अतिवृष्टी आणि महापुरामुळे उध्वस्त झालेल्या केरळमधील जनतेच्या मदतीसाठी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन मदद’ लॉन्च केले.
  • या ऑपरेशन अंतर्गत नौदलाने तेथे स्वयंपाक तयार करण्यासह, जेवणाची पाकिटे पुरविणे, रुग्णांवर उपचार करणे, अडकलेल्यांची सुटका करणे अशी बहुआयामी बचावकार्ये केली.
  • कोचिन नाविक तळाजवळ असलेला ‘आयएनएस गरूड’ हा हवाईतळ नौदलाच्या ‘ऑपरेशन मदद’ या बचाव मोहिमेचे प्रमुख केंद्र आहे.
  • ध्रृव, सी-किंग, चेतक, हवाईदलाचे एमआय-१७ या हेलिकॉप्टर्सनी नागरिकांच्या बचावासाठी आयएनएस गरूडवरुन असंख्य फेऱ्या केल्या.
  • या मोहिमेसाठी मुंबईहून ८ लाख लिटर पाणी, १३,५९२ किलो खाद्यान्न, ४८८ किलो धान्य, १२२८ किलो जेवणाची पाकिटे, ३४०० पाण्याच्या बाटल्या व ३१०० पाणी पाऊच घेऊन आयएनएस दीपक हे जहाजही कोचिनला पाठविण्यात आले.
  • कोचिन जवळील आयएनएस वेंदुरुथी या नौदलाच्या प्रशासकीय तळामार्फतही अहोरात्र जेवणाची सोय करण्यात आली.
  • दरम्यान पुराने अक्षरशः वेढलेल्या केरळची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून, पाऊस कमी झाल्यामुळे १४ जिल्ह्यांमध्ये दिलेला रेड अलर्ट हटवण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा