चालू घडामोडी : १६ ऑगस्ट
निधन : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर
- भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान कर्णधारांपैकी एक असलेल्या अजित वाडेकर यांचे वयाच्या ७७व्या १५ ऑगस्ट रोजी निधन झाले.
- परदेशी जमिनीवर भारतीय संघाला जिंकायची सवय लावून देणारा कर्णधार अशी अजित वाडेकर यांची ओळख आहे.
- भारतीय क्रिकेट संघाच्या प्रतिकूल काळात वाडेकर यांनी १९७१साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी त्यांनी केली होती.
- वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवून देणारे वाडेकर हे भारताचे पहिले कर्णधार होते. (परदेशात कसोटी मालिका जिंकणारे पहिले भारतीय कर्णधार होते.)
- १९५८पासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणाऱ्या वाडेकरांनी १९६६मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
- आक्रमक फलंदाजी करणारे वाडेकर भारताच्या सर्वोत्तम स्लीप क्षेत्ररक्षकांपैकी एक होते. १९६६ ते १९७४ या कालावधीत त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर ते एकूण ३७ कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी १ शतक आणि १४ अर्धशतकांसह एकूण २११३ धावा केल्या.
- निवृत्तीनंतर १९९०च्या दशकात वाडेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले होते.
- कसोटी संघाचे सदस्य, कर्णधार, व्यवस्थापक आणि निवड समितीचे अध्यक्षपद अशी सर्व ठिकाणी कामगिरी केलेल्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये वाडेकर यांचा समावेश होतो.
- भारत सरकारने १९६७मध्ये अर्जुन पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता. तर १९७२मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हिंदू महासभेकडून देशातील पहिल्या हिंदून्यायालयाची स्थापना
- हिंदू महासभेने देशातील पहिल्या हिंदून्यायालयाची स्थापना केली आहे. शरियतच्या धर्तीवर या न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.
- या न्यायालयात हिंदूंशी संबंधित खटल्यांवर निकाल देण्यात येतील. हे न्यायालय दारुल काझाच्या (शरियत न्यायालय) बरोबरीचे असेल, असे हिंदू महासभेकडून सांगण्यात आले आहे.
- दारुल काझाकडून इस्लाम कायद्यानुसार विविध प्रकरणांवर निर्णय दिले जातात. त्याच धर्तीवर हिंदू महासभेने हिंदू न्यायालयाची स्थापना केली आहे.
- या न्यायालयात हिंदू महिलांनावर होणारे अत्याचार, हिंदूंचे विवाह, संपत्ती आणि पैशांचे वाद यावर निकाल देण्यात येणार आहेत.
- मेरठच्या शारदा रोडजवळ हे न्यायालय आहे. १५ ऑगस्टपासून या न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे.
- हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकुन पांडे यांची या न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या न्यायालयाच्या त्या पहिल्या न्यायाधीश आहेत.
इटलीमध्ये १२ महिन्यांसाठी आणीबाणी लागू
- इटलीच्या जिनिव्हा शहरात १४ ऑगस्ट रोजी वादळामुळे येथील मोरांडी उड्डाणपुलाचा भाग कोसळून मोठा अपघात झाला. आत्तापर्यंतची इटलीतील ही सर्वांत मोठी दुर्घटना आहे.
- या दुर्घटनेमध्ये पुलावरून त्यावेळी जाणाऱ्या ३५ कार व काही ट्रक १५० फूट खाली पडून ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. रेल्वे मार्गावर हा पूल पडल्याने रेल्वे सेवाही ठप्प झाली आहे. या दुर्घटनेमध्ये ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.
- सध्या बचावकार्य सुरू असून अनेक जण पुलाच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असल्याने, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- ९० मीटर उंच आणि १ किलोमीटर लांबीचा हा पूल फ्रान्सच्या दिशेने जाणाऱ्या १०, तर उत्तर मिलानच्या दिशेने जाणाऱ्या ७ मुख्य मार्गांना जोडतो. १९६७साली हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
- या घटनेनंतर इटलीचे पंतप्रधान ज्यूसपे कॉन्टे यांनी १५ ऑगस्टपासून १२ महिन्यांसाठी आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे.
- पंतप्रधान कॉन्टे यांनी या घटनेच्या चौकशी आणि बचाव कार्यासाठी ५० लाख यूरो म्हणजे जवळपास ४० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.
- या पुलाच्या कंत्राटदाराचीही चौकशी करण्यात येणार असून, त्याचा अहवाल आल्यानंतर अपघातामागचे नेमके कारण समोर येईल. करण्यात येणार आहे.
- या पुलाची देखरेख करणारी कंपनी ऑटोस्ट्रेडवर कारवाई करण्यात येणार असून या कंपनीची मान्यता काढून घेण्यात येणार असल्याचे कॉन्टे यांनी सांगितले. तसेच पुलाची या कंपनीला १५० दशलक्ष युरोचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा