केरळमधील जनतेला आपल्या मदतीची गरज

देवाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये धुवाधार बरसणारा पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या महापूरात आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. लोक वेगवेगळया भागांमध्ये अडकून पडले असून अन्न-पाण्यावाचून लोकांचे हाल होत आहेत.

निसर्गाच्या या कोपामुळे केरळमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून दिवसरात्र बचावमोहिम सुरु असली तरीही दिवसेंदिवस परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे.

केरळमधील आपल्या बांधवांना आज आपली गरज आहे आणि म्हणूनच आम्ही MPSC Toppersच्या वतीने आमच्या भावी अधिकाऱ्यांना केरळच्या जनतेला शक्य होईल तितकी मदत रोख अथवा वस्तूंच्या स्वरूपात करण्याचे आवाहन करतो.

तुमची मदत गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या केरळ सरकारच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता आणि मुख्यमत्री आपत्ती निवारण निधीमध्ये तुमची मदत जमा करू शकता.

याशिवाय मदत करण्यासाठी तुम्ही Paytmचादेखील वापर करू शकता. Paytm मोबाईल अॅपमध्ये केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वतंत्र Icon उपलब्ध आहे. (संदर्भासाठी खाली Screenshot दिला आहे.)


कृपया शक्य होईल तितक्या लोकांपर्यंत ही माहिती पोहचविण्याचा आणि या कठिण प्रसंगात केरळी जनतेच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहून शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करा. तुमची लहानात लहान मदतही एखाद्याचे प्राण वाचवू शकते.

तुम्ही केलेल्या मदतीचे Screenshots तुम्ही आम्हाला mpsctoppers@gmail.com या पत्यावर ई-मेल करू शकता. (अर्थात तुमची इच्छा असल्यास) आपल्या फेसबुक पेजवर आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये ते प्रसारित करण्यात येतील, जेणेकरून तुमच्याकडून प्रेरणा घेऊन इतरही लोक आपल्या केरळी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा