भारतरत्न २०१९


  • प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नामवंत संगीतकार भूपेन हजारिका यांची या वर्षीच्या देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ सन्मानासाठी निवड झाली आहे.
  • भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महान व्यक्तींना या सर्वोच्च पुरस्काराने गौरवित केले जाते.
  • यंदाचे भारतरत्न जाहीर करताना सत्ताकारण, समाजसेवा व संगीत अशा तीन क्षेत्रांतील दिग्गजांना गौरविण्यात आले.
  • यापैकी नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना हा सन्मान मरणोत्तर जाहीर झाला.

प्रणब मुखर्जी
  • भारतीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले निष्णात राजकारणी प्रणब मुखर्जी हे भारताचे १३वे राष्ट्रपती होते. २०१२ ते २०१७ या कालावधीत त्यांनी देशाचे राष्ट्रपतीपद सांभाळले.
  • ११ डिसेंबर १९३५ रोजी त्यांचा तत्कालीन बंगाल प्रांतातील मिराती येथे जन्म झाला. १९९१ ते १९९६ या काळामध्ये ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.
  • भारतीय राजकारणातील ‘स्टेट्‌समन’ अशी ओळख असलेल्या आपल्या ६ दशकांहून जास्त काळाच्या राजकीय प्रवासात कॉंग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांची भक्कम पाठराखण केली.
  • त्यांनी अर्थ, परराष्ट्र व्यवहार, संरक्षण, वाणिज्य अशी महत्त्वाची सर्व मंत्रालये समर्थपणे हाताळली.
  • अलीकडेच त्यांनी नागपूरला संघ मुख्यालयातील कार्यक्रमाला लावलेली हजेरी हा चर्चेचा विषय ठरला होता.
  • प्रणव मुखर्जी यांनी इमर्जिंग डायमेन्शन्स ऑफ इंडियन इकॉनॉमी, दी टर्ब्ल्युलन्ट इयर्स १९८०-१९९६’आदी काही उत्तम पुस्तकेही लिहिली आहेत.
नानाजी देशमुख
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार यांच्या एका भेटीने संघकार्याकडे ओढले गेलेले नानाजी हे आधुनिक काळातील दधिची म्हणून ओळखले जातात. 
  • त्यांचे संपूर्ण नाव चंडिकादास अमृतराव देशमुख असे होते. परभणी जिल्ह्यात ११ ऑक्टोबर १९१६ रोजी त्यांचा जन्म झाला होता.
  • महाराष्ट्रात जन्म झाला असला तरी त्यांचे कार्यक्षेत्र राजस्थान आणि उत्तर प्रदेशात राहिले. डॉ. हेडगेवारांच्या संपर्कात आल्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले. १९९९साली ते राज्यसभेचे सदस्यही झाले.
  • पुढे नानाजींनी राजकारणातून सन्यास घेतला व दीनदयाळ शोध संस्थेच्या माध्यमातून सर्वांगीण ग्रामविकासाच्या कामाला गोंडा (उत्तर प्रदेश) येथून सुरुवात केली.
  • संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंघाची निर्मिती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी कार्य केले होते.
  • मध्यप्रदेशामधील चित्रकूट व परिसरातील ५०० गावे दत्तक घेऊन नानाजींनी ग्रामविकासाचे काम सुरू ठेवले. या कामाची साऱ्या जगात प्रशंसा झाली.
  • चित्रकूटचे ग्रामीण विद्यापीठ हे हजारो ग्रामस्थांसाठी प्रेरणाकेंद्र ठरले. २७ फेब्रुवारी २०१०रोजी नानाजींनी चित्रकूट येथेच वयाच्या ९३व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला.
  • मात्र आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराचा प्रत्येक अवयवाचा उपयोग समाजाला व्हावा यासाठी त्यांनी देहदान केले.
  • यापूर्वी त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊनही गौरवले होते.
भूपेन हजारिका
  • भूपेन हजारिका सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि चित्रपट निर्माते होते. त्यांनी मुख्यत्त्वे आसामी भाषेत गाणी गायली.
  • आसामीसह बंगाली व हिंदी सिनेसंगीत क्षेत्रातही हजारिका यांनी मुशाफिरी केली. गांधी अँड हिटलर चित्रपटात त्यांनी गायलेले ‘वैष्णव जन तो’ हे भजन जगभरातील रसिकांची दाद मिळविणारे ठरले.
  • ८ सप्टेंबर १९२६ रोजी त्यांचा तत्कालीन आसाम प्रांतातील सदिया येथे जन्म झाला होता. तर ५ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांचे निधन झाले.
  • त्यांना आतापर्यंत पद्मश्री (१९७७), पद्मभूषण (२००१), पद्मविभूषण (२०१२), दादासाहेब फाळके (१९९२) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • तसेच ब्रह्मपुत्रा नदीवरील धोला-सदिया या पुलाला भूपेन हजारिका यांचे नाव देण्यात आले आहे.
  • ईशान्य भारतातील लोकांना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुण्यातील सरहद संस्थेतर्फे २०१३पासून ‘भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान केला जातो.
भारतरत्न पुरस्काराबद्दल
  • भारतरत्न हा देशाचा सर्वात मोठा नागरी सन्मान असून देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. १९५४ मध्ये हा सन्मान सुरू झाला.
  • वंश, व्यवसाय, लिंगभाव यावर आधारित भेदभावाशिवाय तो पात्र व्यक्तीस दिला जातो.
  • पंतप्रधान भारतरत्नसाठी व्यक्तींच्या नावाची शिफारस करतात. इतर औपचारिक शिफारशींची गरज नसते.
  • एका वर्षांत जास्तीत जास्त ३ जणांना भारतरत्न पुरस्कार देता येतो.
  • भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला सनद (प्रमाणपत्र) व पदक दिले जाते.
  • राज्यघटनेच्या कलम १८ (१) अनुसार पुरस्कार हा नावापुढे किंवा मागे लावता येत नाही. बायोडाटामध्ये मात्र भारतरत्न उल्लेख केला जाऊ शकतो. लेटरहेड किंवा व्हिजिटिंग कार्डमध्ये त्याचा उल्लेख करता येतो.
  • भारतरत्न सन्मान राष्ट्रपती प्रदान करतात. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला.
  • १९५५साली कायद्यात बदल करून मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करून घेण्यात आली. त्यानंतर १९६६साली लाल बहादूर शास्त्री यांना पहिल्यांदा मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला. आजपर्यंत १४ जणांना मरणोत्तर भारतरत्न दिले गेलेले आहे.
  • आत्तापर्यंत ४८ जणांना हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात ३ नावे परदेशी व्यक्तींची आहेत.
  • १९९२साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहित याचिकेचा आधार घेवून नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्युचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता.
  • भारतरत्न पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील व्यक्ती: महर्षी धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जे. आर.डी. टाटा, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, नानाजी देशमुख.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा