अरूनिमा सिन्हाने माऊंट विन्सन केला सर
- भारताची दिव्यांग गिर्यारोहक व माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अरूनिमा सिन्हाने अंटार्टिकामधील सर्वात उंच शिखर माऊंट विन्सन सर करत विश्वविक्रम केला.
- अरूनिमाने याआधी २०१३मध्ये जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करत, असा विक्रम करणारी पहिली दिव्यांग गिर्यारोहक ठरली होती.
- आता ती माऊंट विन्सन सर करणारी जगातील पहिली दिव्यांग गिर्यारोहक ठरली आहे.
- अरुनिमा सिन्हाचा जन्म २० जुलै १९८८ उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. ती राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू होती.
- अरुनिमा सिन्हाला २०११मध्ये काही दरोडेखोरांनी चालत्या रेल्वेतून बाहेर फेकले होते. यावळी तिचा डावा पाय तुटला होता.
- पण तिने हार न मानता ६ खंडातील सर्वात मोठी शिखरे सर करण्याचा निर्धार केला होता. त्यातील एव्हरेस्ट, किलिमांजारो, एब्रूस, कोसियुझ्को आणि अकोंकागुआ शिखरे सर केली होती. आता तिने माऊंट विन्सनही सर केले आहे.
- एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला असलेल्या बचेंद्री पाल यांनी तिला प्रशिक्षण दिले आहे.
- तिला २०१५मध्ये पद्मश्री आणि तेनसिंग नोर्गे नॅशनल ॲडव्हेन्चर अवॉर्ड प्रदान करण्यात आला होता. २०१६मध्ये तिला फर्स्ट लेडी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- याशिवाय तिला वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अॅवार्डनेही सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र भाषा विभागाचे विविध पुरस्कार जाहीर
- महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागातर्फे श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार आणि अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
- मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे २७ फेब्रुवारी २०१९ रोजी हे चारही पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहेत.
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
- मराठी नाट्यलेखनात एक मापदंड निर्माण करणाऱ्या महेश एलकुंचवार यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
- वैविध्य, गांभीर्य, व्यामिश्रता, आशयघनता आणि नाट्यमयतेसह पात्रांच्या मनाचा शोध घेण्याची विलक्षण क्षमता या घटकांसह श्री. एलकुंचवार यांनी नाट्यलेखन केले.
- त्यांनी रसिकांचे प्रबोधन केले आणि त्याचबरोबर दिग्दर्शक अभिनेते यांचा कस लागेल असे नाट्यलेखन केले.
- त्रिधारा (तीन नाटकांची मालिका) नाट्यप्रकार मराठी भाषेला देणाऱ्या महेश एलकुंचवार यांच्या अनेक नाटकांचे हिंदी, कन्नड व बंगाली भाषांत अनुवाद झाले आहेत.
- त्यांना आत्तापर्यंत सरस्वती सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कार,जनस्थान पुरस्कार आदी मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार
- मराठी भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक, भाषावैज्ञानिक आणि मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी अखंडपणे कार्यरत असलेले डॉ. कल्याण काळे यांना यावर्षीचा डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
- सुमारे ३१ वर्षांच्या महाविद्यालयीन व विद्यापीठीय अध्यापनातून डॉ. काळे यांनी मराठी अभिमानी आणि अभ्यासक, असे असंख्य विद्यार्थी घडवले.
- भाषा आणि जीवन या त्रैमासिकाचे संपादन आणि मराठी अभ्यास परिषदेचे कार्य या माध्यमातून डॉ. अशोक केळकरांची धुरा डॉ. कल्याण काळे यांनी समर्थपणे वाहिली आहे.
मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार
- झाडीबोलीचे अभ्यासक, प्रसारक आणि झाडीबोली साहित्य चळवळीचे अध्वर्यू डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना यंदाचा मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार देण्यात येणार आहे.
- झाडीबोली साहित्य संमेलने, झाडी-मराठी कोशलेखन, लेखकांना प्रोत्साहन व प्रशिक्षण आणि झाडीबोली संशोधन व मार्गदर्शन केंद्राचे कार्य या माध्यमातून डॉ. बोरकर झाडीबोलीचा विकास साधत आहेत.
- मराठीची महत्त्वाची बोली असलेल्या झाडीचे जतन व संवर्धन साधत, डॉ. हरिश्चंद्र बोरकर मराठी भाषा विकासात अमूल्य योगदान देत आहेत.
श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार
- गेल्या ४८ वर्षांपासून मराठी प्रकाशन क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि सुमारे ३०० दर्जेदार पुस्तके प्रकाशित केलेल्या साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशनास हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
यार्न बँक योजना: विस्तृत माहिती
- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने पॉवरटेक्स इंडिया योजनेचा एक भाग म्हणून यार्न बँक योजना सुरू केली आहे. यार्नच्या किंमतीमधील अस्थिरता कमी करणे हा या योजनेचा आहे.
या योजनेची उद्दिष्टे
- घाऊक दराने धाग्याची खरेदी करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) किंवा कन्सोर्टियमला व्याजमुक्त कॉर्पस निधी प्रदान करणे. ज्यामुळे ते लहान विणकरांना वाजवी किंमतीत देऊ शकतील.
- धाग्याच्या विक्रीवर मध्यस्थ आणि स्थानिक पुरवठादारांची दलाली रोखणे.
- या योजनेअंतर्गत पॉवरलूम विणकरांच्या कंसोर्टियम किंवा स्पेशल पर्पज व्हेइकलला २ कोटीपर्यंत व्याजमुक्त कार्पस फंड देण्याची सुविधा आहे.
पॉवरटेक्स इंडिया
- देशातील पॉवर लूम क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे आणि देशातील पायाभूत सुविधांना चालना देणे, हा पॉवरटेक्स इंडियाचा उद्देश आहे.
- पॉवरटेक्स इंडिया पॉवर लूम सेक्टरच्या विकासासाठी एक व्यापक आणि एकीकृत योजना आहे. या योजनेचे मुख्य घटक पुढीलप्रमाणे:
- प्लेन पॉवर लूममध्ये सुधारणा.
- ग्रुप वर्कशेड योजना.
- यार्न बँक योजना.
- पॉवर लूम विणकरांसाठी पंतप्रधानांची पतयोजना.
- सार्वजनिक सुविधा केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर: सीएफसी).
- पॉवर लूमसाठी सौरऊर्जा योजना.
- पॉवर लूम योजनांचे विपणन, मार्केटिंग, जागरूकता इ. साठी सहाय्य.
- टेक्स व्हेंचर कॅपिटल फंड.
- पॉवर लूम सेवा केंद्राचे आधुनिकीकरण आणि उन्नतीकरण.
कुंभ मेळ्यासाठी रेल्वेचे ‘रेल कुंभ सेवा’ मोबाईल अॅप
- प्रयागराजमधील कुंभ मेळ्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी उत्तर-मध्य रेल्वेने ‘रेल कुंभ सेवा’ मोबाईल अॅप सुरू केले आहे.
- हे मोबाईल अॅप भक्त, पर्यटक आणि इतर प्रवाशांना महत्वपूर्ण माहिती देण्यासाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे. हे अॅप त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
- हे अॅप मेळा मैदान आणि शहरातील दिशादर्शनासाठी उपयुक्त आहे.
- कुंभमेळ्या दरम्यान या अॅपद्वारे विशेष रेल्वे गाड्यांबद्दल माहिती मिळेल.
- हे अॅपमध्ये लोकांना आरक्षित आणि अनारक्षित तिकिटे काढण्यासाठी लिंक प्रदान करण्यात येईल.
- या अॅपद्वारे लोकांना त्यांचे वर्तमान स्थान तसेच रेल्वे स्थानक, मेळा झोन, हॉटेल, बस स्टेशन इत्यादीसाठीच्या मार्गांची माहिती मिळेल.
- या अॅपमध्ये स्टेशनवरील सुविधा जसे पार्किंग लॉट, प्रतीक्षा कक्ष, बुकस्टॉल, फूड प्लाझा, एटीएम इत्यादीची माहिती देखील मिळेल.
- टीप: यंदाच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद जिल्ह्याचे नामांतर प्रयागराज असे केले आहे व केद्र सरकारनेही त्याला मंजुरी दिली आहे.
कुंभमेळा
- कुंभमेळा म्हणजे ठरावीक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.
- दर ३ वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने १२ वर्षांत अलाहाबाद (प्रयाग), उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या ४ वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात.
- दर ६ वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो. १२ पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर अलाहाबाद येथे महाकुंभमेळा भरतो.
- भारतभरातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यांत हजेरी लावतात व या शहरांच्या पवित्र नद्यांच्या किनाऱ्यांवर पूजा अर्चा केली जाते.
- पवित्र जलाने स्नान करण्याबरोबरच विविध धार्मिक विधीही या काळामध्ये केले जातात. भारताच्या इतिहासाशी आणि सामाजिक सौहार्दाशी जोडलेला हा एक उत्सव आहे.
- हा धार्मिक महोत्सव सहिष्णुता आणि सर्वसमावेशक प्रवृत्तीचे दर्शन घडवतो. यात कोणत्याही भेदभावाशिवाय लोक सहभागी होतात.
- मंत्र आणि उपदेशांद्वारे गुरुद्वारे शिष्यांना ज्ञान देण्याची परंपरा या कुंभमेळ्याद्वारे चालवली जाते.
आख्यायिका व सांस्कृतिक संदर्भ
- हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते.
- युद्धात अमृतकुंभातील ४ थेंब जमिनीवर पडले. ज्या ४ ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या ४ ठिकाणी कुंभमेळे भरतात.
- पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरीत व चौथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता.
- आज ही चारही स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.
महाराष्ट्राची अटल सौर कृषीपंप योजना
- महाराष्ट्र सरकारने अटल सौर कृषीपंप योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना १ एलईडी बल्ब, १ डीसी पंखा आणि १ मोबाइल चार्जिंग सॉकेट विनामुल्य देण्याची घोषणा केली आहे.
- सौर उर्जेला चालना देण्यासाठी तसेच कृषीपंपांच्या थकीत वीजबिलाचा वाढता बोजा कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरु केली आहे.
- या योजनेद्वारे राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र अधिक वाढावे व शेतकऱ्यांना शेतीला दिवसा पाणी देणे शक्य व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- या योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना अनुदानित किंमतींत सौर कृषीपंप पुरविते.
- या योजनेअंतर्गत, ५ एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ३ एचपीच्या सौर पंपासाठी फक्त पंपाच्या रकमेच्या ५ टक्के रक्कम द्यावी लागेल. उर्वरित ९५ टक्के निधी केंद्र आणि राज्य शासनाचा राहील.
- ज्या शेतकऱ्यांना ५ एकरपेक्षा अधिक जमीन असेल त्यांना ३० हजार रुपयांमध्ये ५ अश्वशक्तीचा (एचपी) सौर पंप दिला जाईल.
- या योजनेमुळे दुर्गम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विशेष लाभ होणार आहे.
अनिन्दिता निओगी अनाम यांना राष्ट्रीय नृत्य शिरोमणी पुरस्कार
- कथक नृत्यांगना अनिन्दिता निओगी अनाम यांना प्रतिष्ठित राष्ट्रीय नृत्य शिरोमणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- कथक नृत्य प्रकारचा जगभरात प्रसार करण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- १०वा कटक महोत्सव: आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सवामध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
- कटक महोत्सव हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव असून, त्याचे आयोजन उत्कल युवा सांस्कृतिक संघ ओडिशा राज्य सरकारच्या ओडिया भाषा विभागाच्या सहकार्याने केले जाते.
- मुळच्या भारतीय परंतु सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अनिंदिता यांनी पंडित राजेंद्र गंगाणी व पंडित जयकिशन महाराज यांच्याकडे कथकचे प्रशिक्षण घेतले आहे.
- त्या जयपूर आणि लखनऊ या दोन्ही घराण्याच्या कथक नृत्य प्रकारांमध्ये पारंगत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण २०१९
- केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप पुरी यांनी केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ सुरू केले. स्वच्छ सर्वेक्षणाची ही चौथी आवृत्ती असेल.
- या सर्वेक्षणात देशभरातील ४०००पेक्षा जास्त शहरांमध्ये स्वच्छतेशी संबंधित सर्वेक्षण केले जाईल. हे काम पेपररहित असेल आणि ते २८ दिवसात पूर्ण होईल.
स्वच्छ भारत अभियान
- हे भारताच्या ४०००हून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरु केलेला राष्ट्रीय पातळीवर अभियान आहे. या अभियानाचे घोषवाक्य ‘एक कदम स्वच्छता की ओर’ हे आहे.
- हे अभियान महात्मा गांधींच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी राजघाट, नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरु झाले.
- महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीला म्हणजेच २ ऑक्टोबर २०१९ रोजी गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
- स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही पूर्वीच्या निर्मल भारत अभियानाची पुनर्रचना करून करण्यात आली आहे.
- स्वच्छ भारत अभियान ग्रामीण आणि शहरी अशा दोन टप्प्यांत विभागण्यात आले आहे. ग्रामीण भागात या अभियानाची अंमलबजावणी केंद्रीय पेंयजल व स्वच्छता मंत्रालयाव्दारे तर शहरी भागात केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाव्दारे करण्यात येते.
नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय मध्यस्थी केंद्र विधेयक
- नवी दिल्लीमध्ये सुधारित आंतरराष्ट्रीय मध्यस्थी केंद्राची स्थापना करण्यासाठी आणि भारताला मध्यस्तीचे केंद्र बनविण्याच्या उद्देशाने, नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय मध्यस्थी केंद्र विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.
- या विधेयकामध्ये संस्थात्मक मध्यस्थीसाठी स्वतंत्र आणि स्वायत्त व्यवस्थेची स्थापना करण्याची तरतूद आहे.
- नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय मध्यस्थी केंद्र पर्यायी विवाद निराकरणासाठी आंतरराष्ट्रीय केंद्राकडून (ICADR) अंडरटेकिंग हस्तांतरित करेल. भारताचे सरन्यायाधीश ICADRचे पदासिध्ह अध्यक्ष असतात.
- संस्थात्मक मध्यस्थीमधील विकासात येणाऱ्या अडथळ्यांच्या अभ्यासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्या. बी एन श्रीकृष्ण समितीच्या शिफारशीनुसार नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय मध्यस्थी केंद्राची स्थापना करण्यात येत आहे.
- न्या. बी एन श्रीकृष्ण समितीने ICADRच्या शासन संरचनेत बदलांची शिफारस केली होती.
- आंतरराष्ट्रीय मध्यस्थता केंद्र म्हणून जागतिक दर्जाचे मध्यस्थी केंद्र आणि भारत म्हणून केंद्र विकसित करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक नवीन दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र आहे.
- नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय मध्यस्थी केंद्र विधेयकाद्वारे सरकार या केंद्राला जागतिक दर्जाचे मध्यस्थी केंद्र आणि भारताला आंतराष्ट्रीय मध्यस्थीचे केंद्र विकसित करू इच्छिते.
विजय मल्ल्या फरार आर्थिक गुन्हेगार घोषित
- भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याला अखेर फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे.
- त्यामुळे त्याची संपत्ती जप्त करण्याचा सक्तवसुली संचालनालयाचा (इडी) मार्ग मोकळा झाला आहे.
- विजय मल्ल्या हा या नव्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित झालेला देशातील पहिलाच आरोपी आहे.
- किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेला मल्ल्या २०१६मध्ये ब्रिटनला फरार झाला होता.
- गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच भारत सरकारने मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनला विनंती केली होती.
- एप्रिल २०१७मध्ये स्कॉटलंड यार्डने मल्ल्याला अटक केली होती. परंतु तो जामिनावर सुटला होता.
- त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रकरण ४ डिसेंबर २०१७पासून लंडनच्या न्यायालयात सुरू आहे.
फरार आर्थिक गुन्हेगार कायदा
- आर्थिक घोटाळे करून देशाबाहेर पलायन करणाऱ्या आरोपींना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायदा २०१८’ हा नवा कायदा केला आहे.
- त्याअंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया टाळणाऱ्या आरोपींना न्यायालयाकडून ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करण्यात आल्यानंतर त्यांची संपत्ती तत्काळ जप्त करण्याची तरतूद आहे.
- आर्थिक घोटाळा करून परदेशात पळून गेलेल्या, कारवाई होईल या भीतीने भारतात येण्यास नकार देणाऱ्या आरोपींना हा कायदा लागू होत असून १०० कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा करणारे या कायद्याच्या कक्षेत येतात.
- कर्जबुडवे तसेच आर्थिक गैरव्यवहार करणारे २७ व्यावसायिक गेल्या ५ वर्षांत भारताबाहेर गेले असल्याची माहिती संसदेत सरकारच्या वतीने देण्यात आली.
व्यवसाय सुलभीकरणामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
- आशिया प्रतीस्पर्धात्मक संस्थेने भारतीय राज्यांची व्यवसाय सुलभीकरणासाठीची क्रमवारी (ईझ ऑफ डूइंग बिझनेस रँकिंग) प्रकाशित केली आहे.
- या क्रमवारीत आंध्रप्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्र आणि दिल्ली अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
- व्यवसाय आकर्षणामध्ये आंध्रप्रदेश २०१६मध्ये सातव्या क्रमांकावर होता. मात्र यावर्षी आंध्रप्रदेशला प्रथम स्थान देण्यात आले आहे.
- गुंतवणूकदारांसाठी आंध्रप्रदेश एक चांगले ठिकाण बनले आहे. तर प्रतिस्पर्धी धोरणांमध्ये आंध्रप्रदेश दुसऱ्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर पोहचला आहे.
- आंध्रप्रदेशची २०१६मधील एकूण क्रमवारीत ५व्या स्थानी होता, जो यंदाच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
सुनील छेत्रीचे मेस्सीपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गोल
- भारतीय फुटबॉल संघाने आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या अ गटातील सामन्यात थायलंडचा ४-१ असा पराभव करत, या स्पर्धेत ५५ वर्षानंतर पहिल्या विजयाची चव चाखली.
- या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने २ गोल करून अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकण्याचा पराक्रम केला. छेत्रीच्या पुढे आता फक्त पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा खेळाडू आहे.
- सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या सक्रीय फुटबॉल खेळाडूंच्या यादीत सुनील छेत्री दुसऱ्या स्थानी पोहचला आहे.
- छेत्रीच्या नावार १०५ आंतरराष्ट्रीय सामन्यात ६७ गोल आहेत. मेस्सीच्या नावार १२८ सामन्यात ६५ गोल, तर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावार १५४ सामन्यात ८५ गोल आहेत.
- छेत्रीने आशियाई स्पर्धेत आतापर्यंत ५ गोल केले आहेत. २०११च्या या स्पर्धेत त्याने ३ गोल केले होते. तो या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा भारतीय खेळाडू आहे.
- सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री ‘कॅप्टन फॅन्टास्टिक’ म्हणून ओळखला जातो.
- सुनील बंगळुरू एफसी आणि भारतीय राष्ट्रीय संघासाठी स्ट्राइकर म्हणून खेळतो.
- भारतीय फुटबॉल फेडरेशनचा (एआयएफएफ) सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान त्याला एकूण ५ वेळा (२००७, २०११, २०१३, २०१४, २०१७) मिळाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा