चालू घडामोडी : ९ सप्टेंबर

भारत आणि झेक रिपब्लिक दरम्यान पाच करार

  • भारत आणि झेक रिपब्लिक या देशांनी संरक्षण, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन, लेझर तंत्रज्ञान, शेती आणि राजनयिक व्हिसा या क्षेत्रात पाच करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
  • झेक रिपब्लिकची राजधानी प्रागमध्ये भारताचेराष्ट्रपती रामनाथ कोविंद व चेक रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष मालोस जॅमन यांच्यातील चर्चेनंतर करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.
  • सध्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद सायप्रस, बल्गेरिया आणि झेक रिपब्लिक या ३ युरोपीय देशांच्या दौऱ्यावर आहेत.
 पाच करार 
  • सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च कौन्सिल ऑफ इंडिया (सीएसआयआर) आणि झेक अकादमी ऑफ सायन्सेस यांच्यात सहकार्यासाठी करार.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय-झेक प्रकल्पांची अंमलबजावणी.
  • राजनयिक पासपोर्ट धारकांसाठी व्हिसामधून सुट.
  • भारताची टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) आणि झेकची ईएलआय बीमलाईन्स यांच्यात लेसर तंत्रज्ञानातील सहकार्यासाठी करार.
  • हरियाणा कृषी विद्यापीठ आणि झेक जैवविज्ञान विद्यापीठ यांच्यात सहकार्यासाठी करार.
  • याशिवाय, दोन्ही देशांमध्ये नागरी अणुऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासही सहमती झाली आहे.

गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेससाठी राष्ट्रीय मोहीम सुरु

  • केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेससाठी (जीईएम) राष्ट्रीय मोहीम सुरु केली आहे.
  • जीईएमबद्दल जागरुकता निमार्ण करणे आणि मंत्रालये, राज्य सरकार आणि त्यांच्या एजन्सीद्वारे जीईएमच्या वापरला चालना देणे हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे.
  • जीईएमद्वारे केंद्र सरकारचे विविध विभाग, राज्य सरकार आणि सरकारी कंपन्या यांना देनंदिन वापरातल्या वस्तू आणि सेवांचा खरेदी करू शकतात.
  • या मोहिमेचा हेतू वस्तू खरेदीला पारदर्शक, रोखरहित (कॅशलेस) आणि कागदीविरहित (पेपरलेस) करणे आहे. यामुळे माल खरेदीवर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची बचत होईल.
  • या मोहिमेत सर्व केंद्र सरकारचे विभाग, राज्य सरकार आणि सरकारी कंपन्याही सहभागी होतील. याअंतर्गत खरेदीदार आणि विक्रेते यांना जीईएमचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
  • जीईएमद्वारे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्थानिक उत्पादक, महिला उद्योजक आणि बचतगट आपली उत्पादने आणि सेवा सरकारी विभागांना पुरवू शकतात. यामुळे त्यांच्या व्यवसायातही वृद्धी होईल.
 गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस 
  • जीईएम हे ऑगस्ट २०१८मध्ये सुरू करण्यात आलेले एक ऑनलाइन व्यासपीठ आहे, जेथे विविध सरकारी विभाग आणि संस्था त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतात.
  • यामुळे सरकारी विभागांकडून केली जाणारी माल खरेदी पारदर्शक, कॅशलेस आणि पेपरलेस होणार आहे. तसेच अतिरिक्त सरकारी खर्चाची बचत होईल.
  • या व्यासपीठावर १.३५ विक्रेते आणि त्यांच्या सुमारे ४.४३ लाख वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच सुमारे २६,५०० ग्राहक संस्थाही या व्यासपीठाशी जोडल्या गेल्या आहेत.

महाराष्ट्राला मनरेगासाठीचे चार पुरस्कार

  • केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार २०१८’ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला ४ पुरस्कार जाहीर झाले आहेत.
  • रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी महाराष्ट्राला राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा ४ श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले.
  • याशिवाय मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्ग झालेल्या रोजगार निर्मितीची खास दखल घेण्यात आली आहे.
  • ११ सप्टेंबर २०१८ रोजी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
  • गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे. येथे आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये ३९.१२ लाख मानवी दिनाची निर्मिती झाली.
  • तसेच मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्हयातीलच गडचिरोली ब्लॉकमधील नागरी ग्रामपंचायतीची सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे.
  • ठाणे जिल्हयातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक श्रीमती नुतक प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यातील सर्वोत्तम ग्राम डाकसेवक म्हणून निवड झाली आहे.
  • त्यांनी या भागातील कामगारांना मनरेगा अंतर्गत विविध कामे व योजनांची माहिती दिली व या भागात मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी कामगारही उपलब्ध करून दिले.

अरपींदर सिंगला कॉण्टीनेंटल कप स्पर्धेत कांस्यपदक

  • अरपींदर सिंगने झेक प्रजासत्ताकमध्ये सुरू असलेल्या आयएएएफ कॉण्टीनेंटल कप स्पर्धेत तिहेरी उडीत कांस्यपदक जिंकले. या प्रतिष्ठित स्पर्धेत पदक जिंकणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला.
  • त्याने नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तत्पूर्वी त्याने २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.

नाओमी ओसाकाला अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद

  • जपानची युवा खेळाडू नाओमी ओसाकाने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सवर मात करुन अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत नाओमीने सेरेनाचा ६-२, ६-४ असा पराभव केला.
  • नाओमीचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. कोणत्याही ग्रँडस्लॅम एकेरी स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी नाओमी पहिली जपानी खेळाडू ठरली आहे.
  • आशिया खंडातून ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ती दुसरी खेळाडू ठरली आहे. याआधी फक्त चीनच्या ली ना या खेळाडूने अशी कामगिरी केली आहे.
  • यापूर्वी मार्च २०१८मध्ये नाओमीने अमेरिकेमध्ये झालेल्या इंडियन वेल्स ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१९च्या निवडणुकीसाठी दिलेली घोषणा
  • अजेय भारत; अटल भाजपा

स्वित्झर्लंडमध्ये श्रीदेवी यांचा पुतळा उभारणार

  • भारतीयांसाठी स्वित्झर्लंड हे पर्यटनाचे लोकप्रिय ठिकाण बनविण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा पुतळा स्वित्झर्लंडमध्ये उभारण्यात येणार आहे.
  • यापूर्वी स्वित्झर्लंडच्या पर्यटन विभागाने निर्माते यश चोप्रा यांचाही इटरलाकेन शहरात त्यांचा पुतळा उभारला आहे. तसेच २०११मध्ये त्यांना त्या शहराचे मानद राजदूत म्हणूनही बहुमान देण्यात आला.
  • आल्प्स पर्वतराजीमध्ये विविधतेने नटलेल्या निसर्गरम्य स्वित्झर्लंडमध्ये अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
  • श्रीदेवीच्या ‘चांदनी’ या गाजलेल्या चित्रपटातील बहुतेक सर्व गाण्यांचे चित्रीकरण स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आले होते.
  • १९६४मध्ये प्रदर्शित झालेला राजकपूर यांना ‘संगम’ हा स्वित्झर्लंडमध्ये चित्रीकरण झालेला बॉलीवूडचा पहिला चित्रपट ठरला होता.
  • असेच चित्रीकरण असलेल्या आदित्य चोप्रा यांच्या १९९५मधील ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (डीडीएलजे) या चित्रपटाने लोकप्रियतेचा कळस गाठला होता.
  • त्यामुळे रूपेरी पडद्यावरील स्वित्झर्लंड प्रत्यक्ष पाहण्याची प्रबळ इच्छा भारतातील श्रीमंत व मध्यमवर्गीयांमध्ये जागृत झाली.
  • यामुळे स्वित्झर्लंडमधील पर्यटनास मोठी चालना मिळाली. गेल्या वर्षी सुमारे ३.२६ लाख भारतीय स्वित्झर्लंडला पर्यटक म्हणून गेले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा