चालू घडामोडी : २४ सप्टेंबर

सिक्कीममधील पाक्योंग विमानतळाचे उद्घाटन

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ सप्टेंबर रोजी सिक्कीममधील पाक्योंग विमानतळाचे उद्घाटन केले. सिक्कीममधले हे पहिले तर देशातील १००वे विमानतळ आहे.
  • सिक्कीमच नाही तर भारतासाठीही हे विमानतळ महत्त्वाचे आहे. या विमानतळासोबतच भारताने विमानतळांचे शतक पूर्ण केले आहे.
  • सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून हे विमानतळ ३३ किमी अंतरावर आहे. या विमानतळामुळे सिक्कीमशी उर्वरित राज्यांचा संपर्क वाढेल.
  • या विमानतळाचे काम २००९मध्ये सुरू झाले. ते बांधकाम पूर्ण होण्यास ९ वर्षांचा कालावधी लागला.
  • समुद्रसपाटीपासून ४,५०० फूट उंचीवर, पाकयोंग गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या एका डोंगरावर २०१ एकर परिसरात हे विमानतळ पसरलेले आहे.
  • एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने या विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानातळाचे भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचे आहे.
  • या विमानतळाचा सर्वसामान्यांना जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी हे विमानतळ ‘उडान’ योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.

कमांडर अभिलाष टॉमी यांची सुखरुप सुटका

  • भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी देशी बनावटीच्या ‘थुरीया’ या जहाजातून जागतिक गोल्डन ग्लोब स्पर्धा (जीजीआर) २०१८मध्ये सहभागी झाले होते.
  • मात्र २१ सप्टेंबरला दक्षिण हिंदी महासागरात वादळ आणि खवळलेल्या समुद्रामुळे टॉमी यांच्या नौकेचे नुकसान झाले व ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी सुटकेसाठी संदेश पाठवला होता.
  • २४ सप्टेंबर रोजी फ्रान्सचे मासेमारी जहाज ओसिरीसने त्यांना प्रतिसाद दिला आणि या जहाजावरील चमुने अभिलाष यांची सुखरुप सुटका केली आहे.
  • सध्या ओसिरीस जहाजात त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. भारतीय नौदलाचे जहाज सातपुडा अभिलाष यांना परत आणण्यासाठी रवाना झाले आहे.
गोल्डन ग्लोब रेस
  • ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची आणि अत्यंत कठीण नौकानयन स्पर्धा आहे. यात स्पर्धकांना कोणत्याही बाह्य मदतीविना सागरमार्गे पृथ्वीप्रदक्षिणा करायची असते.
  • जगातील १८ खलाश्यांनी या भाग घेतला असून, ते साधारण ३० हजार सागरी मैलांचा प्रवास करून फ्रान्समधील मूळ ठिकाणी परततील.
  • या स्पर्धेला १ जुलै २०१८ रोजी फ्रान्समधील ला सेब्ला दोलॉन येथून सुरुवात झाली.
  • या स्पर्धेत आतापर्यंत ८४ दिवसांत १०,५०० सागरी मैलांचा खडतर प्रवास करून कमांडर टॉमी हे तिसऱ्या स्थानावर होते.
अभिलाष टॉमी
  • भारतीय नौदलाचे अधिकारी असलेले अभिलाष टॉमी यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९७९ रोजी केरळमध्ये झाला.
  • कमांडर अभिलाष यांनी २०१२-१३मध्ये कोठेही न थांबता ‘म्हादई’ या शिडाच्या बोटीतून सागरपरिक्रमा पूर्ण केली होती.
  • सागरमार्गे पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे पहिले भारतीय ठरले. त्यासाठी त्यांना शौर्यपदकही प्रदान करण्यात आले.
  • सागरपरिक्रमा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय, दुसरे आशियाई आणि जगातील ७९वे व्यक्ती आहेत.

इब्राहिम सोलिह मालदीवचे नवे अध्यक्ष

  • मालदीवमध्ये २३ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मालदिवियन डेमोक्रेटिक पार्टीचे (एमडीपी) इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी ऐतिहासिक विजय मिळविला.
  • इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना पराभूत केले.
  • मालदीवच्या निवडणूक आयोगाने जारी केलेल्या माहितीनुसार, इब्राहिम सोलिह यांना ५८.३ टक्के मते मिळाली.
  • सोलिह हे मालदीवचे भारतासोबत दृढ संबंध असावेत या विचारसरणीचे आहेत. त्यामुळे मालदीवमधील सत्ताबदल हे भारतासाठी अनुकूल मानला जात आहे.
  • देशातील निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करणाऱ्या ट्रान्सपरेंसी मालदीव या स्वायत्त संस्थेने सोलिह यांनी निर्णायक मताधिक्याने विजय मिळवल्याचे म्हटले आहे.
या निवडणुकीचे भारतासाठी महत्त्व
  • मालदीव हा हिंदी महासागरात स्थित १२०० बेटांचा देश आहे, जो भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्वाचा आहे.
  • मालदीवच्या समुद्रामार्गे जपान आणि चीनमधून भारताला ऊर्जा पुरवठा उपलब्ध होतो.
  • मालदीवचे विद्यमान राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन चीनचे समर्थक होते. त्याच्या कार्यकाळात चीनने मालदीवमध्ये पायाभूत सुविधा आणि सेवांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली.
  • २०११पर्यंत चीनकडे मालदीवमध्ये दूत नव्हते, परंतु आता चीनने तेथे लष्करी तळ उभारण्याची तयारी सुरू केली होती.
  • मालदीव सार्कचा सदस्य देखील आहे, त्यामुळे या प्रदेशात भारताचे प्रभुत्व टिकून राहण्यसाठी भारताला मालदीवला सोबत ठेवणे आवश्यक आहे.
  • मालदीवशी भारताने घनिष्ठ सांस्कृतिक संबंध देखील ठेवले आहेत. १९६५मध्ये स्वातंत्र्यानंतर, मालदीवला मान्यता देणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर होता.

यूएनडीपीचा जागतिक गरिबी निर्देशांक अहवाल २०१८

  • संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि ऑक्सफर्ड गरिबी आणि मानव विकास पुढाकार (OPHI) यांनी बहुआयामी जागतिक गरिबी निर्देशांक (MPI) अहवाल २०१८ तयार केला आहे.
  • या अहवालानुसार, २००५-०६ ते २०१५-१६ या १० वर्षांत भारतात २७.१ कोटी लोक गरीबिमधून बाहेर आले आहेत. गरीबीविरोधी जागतिक लढा जिंकण्याच्या दृष्टीने हा एक आशेचा किरण आहे.
अहवालातील ठळक मुद्दे:
  • भारतातील लहान मुले, गरीब राज्ये, आदिवासी आणि मुसलमानांमध्ये दारिद्र्य निर्मूलनाचा दर सर्वात जास्त आहे.
  • २००५-०६ ते २०१५-१६ या १० वर्षात गरीबीचा दर ५५ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर आला आहे.
  • जगभरातील १.३ अब्ज लोक बहु-आयामी दारिद्र्यरेषेखाली राहतात. हे प्रमाण एमपीआयमध्ये संकलित १०४ देशांच्या एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश आहे.
  • बहु-आयामी दारिद्र्यरेषेखाली असलेल्या १.३ अब्ज लोकांपैकी ४६ टक्के लोक तीव्र दारिद्र्याचा सामना करीत आहेत.
  • १९००पासून दक्षिण आशियाई देशांमध्ये लोकांचे सरासरी आयुर्मान ४ वर्षांनी वाढले आहे. तर भारतातील लोकांचे सरासरी आयुर्मान ११ वर्षांनी वाढले आहे.
  • भारतात सर्वाधिक गरीबी बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या ४ राज्यांमध्येआहे.
  • या ४ राज्यांमध्ये भारतातील अर्ध्याहून अधिक गरीब लोक रहातात. ज्यांची संख्या सुमारे १९.६ कोटी आहे.
  • दिल्ली, केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये गरीबांची संख्या सर्वात कमी आहे.

  • पर्यटन मंत्रालयाने १६ ते २७ सप्टेंबर २०१८दरम्यान देशभरात पर्यटन पर्वाचे आयोजन केले आहे. जनतेमध्ये शाश्वत पर्यटन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा या मागचा उद्देश आहे.


भारताच्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी

  • भारताने २३ सप्टेंबर रोजी ओरिसातील बालासोर येथील अब्दुल कलाम बेटावरून (पूर्वीचे व्हीलर बेट) इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • याबरोबरच भारताने द्विस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची ठळक वैशिष्ट्ये:
  • संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
  • या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राच्या मोहिमेचे नाव पृथ्वी डिफेन्स व्हेईकल (पीडीवी) मिशन ठेवण्यात आले आहे.
  • पृथ्वीच्या वातावरणातील ५० किमीपेक्षा जास्त उंचीवरील लक्ष्य भेदण्यासाठी पीडीवी विकसित करण्यात आले आहे.
  • यापूर्वी ११ फेब्रुवारी २०१७ रोजी या इंटरसेप्टरची चाचणी घेण्यात आली होती
  • काही दिवसांपूर्वीच डीआरडीओने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रहार’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.

सेलच्या अध्यक्षपदी अनिल कुमार चौधरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय नियुक्ती समितीने अनिल कुमार चौधरी यांची स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे (SAIL) नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
  • जून २०१८मध्ये निवृत्त झालेले SAILचे अध्यक्ष पी. के. सिंग यांची ते जागा घेतील. डिसेंबर २०२०पर्यंत ते या पदावर राहतील.
  • यापूर्वी अनिल कुमार स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये संचालक (वित्त) म्हणून कार्यरत होते.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल)
  • भारत आणि जगातील ही सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. हा एक सरकारी उपक्रम आहे.
  • १९५४मध्ये या कंपनीची स्थापना झाली. त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी ही एक आहे.
  • या कंपनीची वार्षिक पोलाद उत्पादन क्षमता १४.३८ दशलक्ष टन आहे. ही जगातील २४वी सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी आहे आहे.
  • या कंपनीचे प्रमुख प्रकल्प भिलाई, दुर्गापुर, रुरकेला, बोकारो आणि बर्नपूर येथे आहेत. तर सलेम, दुर्गापुर आणि भद्रावती येथे ३ विशेष पोलाद प्रकल्प आहेत.

कार्यक्षम विकासासाठी भारत आणि जर्मनीमध्ये करार

  • भारत आणि जर्मनीने कार्यक्षम विकासासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे भारतीय तरुणांना व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण मिळेल.
  • या करारावर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स मंत्रालयाने स्वाक्षरी केली.
  • या करारात भारतीय युवकांच्या व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे.
  • या करारानुसार, विद्यार्थ्यांनी भारतात विशिष्ट अभ्यासक्रमामध्ये प्राप्त केलेले प्रमाणपत्र भारत आणि जर्मनी दोन्ही देशांमध्ये वैध असेल.
  • यामुळे अशा विद्यार्थ्यांना भारत आणि जर्मनी यापिकी कोणत्याही देशात नोकरी मिळू शकेल.
  • या कार्यक्रमासाठी जर्मन इंडियन इंस्टिट्यूट ऑफ वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (जीआयआयव्हीईटी) स्थापन करण्यात आली आहे.
  • या करारासाठी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्नीच्यान चँसलर अँजेला मेर्केल यांच्यात चर्चा झाली होती. नंतर हा करार कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स मंत्रालयाने तयार केला.

भारतात हरित कृषी प्रकल्प सुरु

  • भारत सरकारने अन्न व कृषी संघटनेसोबत मिळून हरित कृषी प्रकल्प (ग्रीन एग्रीकल्चर प्रोजेक्ट) सुरू केला.
  • कृषी क्षेत्रातील जैव विविधता आणि वन संरक्षणाद्वारे कृषी क्षेत्रात परिवर्तन आणणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
  • या प्रकल्पाची अंमलबजावणी भारत सरकारच्या कृषी आणि पर्यावरण मंत्रालयाद्वारेकरण्यात येईल.
  • मध्यप्रदेश, मिझोरम, ओडिशा, राजस्थान आणि उत्तराखंड या ५ राज्यांमध्ये हा प्रकल्प सुरु होणार आहे.
  • या प्रकल्पासाठी ३३.५ दशलक्ष डॉलर्स निधी ग्लोबल एनवायरन्मेंट फॅसिलिटीद्वारे पुरविण्यात आला आहे.
  • या प्रकल्पाअंतर्गत, जैव विविधता, जमिनीची धूप, हवामानातील बदल आणि वन व्यवस्थापनाला केंद्रस्थानी ठेवून कृषी उत्पादन घेतले जाईल.
  • याद्वारे देशाच्या विकास आणि पर्यावरण संरक्षण यादरम्यान समन्वय स्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल.
पार्श्वभूमी
  • भारतातील शेती व संबंधित उपक्रम लोकसंख्येच्या मोठ्या भागासाठी उपजीविका देतात. भारतातील ८२ टक्के शेतकरी लहान किंवा भूमिहीन आहेत.
  • जल पातळीमध्ये घट, जमिनीच्या उत्पादकतेमध्ये घट, जैवविविधता आणि प्राण्यांच्या प्राकृतिक स्त्रोतांचा ऱ्हास यामध्ये संसाधनांच्या अकार्यक्षम वापरामुळे वाढ झाली आहे.
  • यामुळे पर्यावरणाची खूप हानी झाली आहे. म्हणूनच भारतात शेतीसाठी शास्त्रशुध्द दृष्टीकोन आणि वैज्ञानिक पद्धती अवलंबण्याची गरज आहे.
अन्न व कृषी संस्था (एफएओ)
  • ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या अंतर्गत कार्यरत एक विशेष संस्था आहे. भूकनिवारणासाठी जगभर प्रयत्न करणे हे ह्या संस्थेचे मुख्य कार्य आहे.
  • १६ ऑक्टोबर १९४५ रोजी या संस्थेची स्थापना झाली. त्याचे मुख्यालय रोम, इटलीमध्ये स्थित आहे. सध्या जगातील १९४ देश ह्या संस्थेचे सदस्य आहेत.
ग्लोबल एनवायरन्मेंट फॅसिलिटी
  • ही एक बहुपक्षीय आर्थिक यंत्रणा आहे, ज्याअंतर्गत पर्यावरण अनुकूल योजना सुरू करण्यासाठी देशांना अनुदान दिले जाते.
  • १९९२च्या रियो अर्थ समिटनंतर या संस्थेची स्थापना झाली. जगाच्या पर्यावरणीय समस्येचे निराकरण करणे हा त्यांचा उद्देश आहे. त्याचे मुख्यालय वॉशिंग्टन, अमेरिका येथे स्थित आहे.
  • या संस्थेद्वारे जैवविविधता, मातीच्या उत्पादकतेतील घट, जलवायू परिवर्तन, आंतरराष्ट्रीय जल क्षेत्र, ओझोन थराची झीज आणि सेंद्रीय प्रदूषके इत्यादि ६ प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य केले जाते.

सुरक्षा क्लिअरन्ससाठी ‘ई-सहज’ हे ऑनलाईन पोर्टल

  • केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी व्यापारी युनिट्सना सुरक्षा मंजूरी (क्लिअरन्स) देण्यासाठी ‘ई-सहज’ हे ऑनलाईन पोर्टल लॉन्च केले.
  • या पोर्टलद्वारे इच्छुक सुरक्षा मंजूरीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात आणि नंतर त्यांचे स्टेटसही पाहू शकतात.
  • ज्या उद्योगांना विशिष्ट परवाने, परवानग्या आणि नियम जरी केले जातात आणि याकरिता सुरक्षा मंजूरी (क्लिअरन्स) आवश्यक असते, अशा काही विशिष्ट उद्योगांद्वारे या पोर्टलचा वापर केला जाईल.
  • काही संवेदनशील क्षेत्रातील कंपन्यांना परवान्यांसाठी सुरक्षा केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरक्षा मंजूरी (क्लिअरन्स) दिली जाते. गुंतवणूक आणि प्रकल्पांशी संबंधित आर्थिक धोक्यांचे मूल्यांकन करणे हा त्यामागचा उद्देश आहे.

  • सर्जिकल स्ट्राइकची दुसरी वर्षपूर्ती भारतीय लष्कर ‘पराक्रम पर्व’ म्हणून साजरी करणार आहे.
  • भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला येत्या २९ सप्टेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.
  • त्यानिमित्ताने भारतीय लष्कर २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान ‘पराक्रम पर्व’ साजरे करणार आहे. या पराक्रम पर्वामध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा