समलैंगिकतेसाठी मृत्यूदंड आणि पाठिंबा देणारे देश

समलैंगिकतेसाठी मृत्यूदंड आणि पाठिंबा देणारे देश

  • समलैंगिकता हा कायद्याने गुन्हा नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे भारताचा समलैंगिक संबंधांना पाठिंबा देणाऱ्या १२०हून अधिक देशांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे.
  • ब्रिटनच्या संसदेने १९६७मध्येच इंग्लंड आणि वेल्समध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर परवानगी दिली. स्कॉटलंडने १९८०साली समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता दिली.
  • महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत सर्वोच्च न्यायलयाने जून २०१५मध्ये समलैंगिक संबंधांना मान्यता दिली.
  • भारताचा शेजारी असणाऱ्या नेपाळनेही भारताच्या ११ वर्षे आधीच म्हणजेच २००७साली समलैंगिक संबंधांना कायद्याचे पाठबळ दिले.
  • आंतरराष्ट्रीय लेस्बियन, गे, बायसेक्शूअल, ट्रान्स आणि इंटरनसेक्स असोशिएशनच्या (आयएलजीए) अहवालानुसार आजही ७२ देशांमध्ये समलैंगिक असणे हा कायद्याने गुन्हा आहे.
समलैंगिक संबंधांना मान्यता देणारे देश
नेदरलँड (२०००) बेल्जियम (२००३)
स्पेन (२००५) कॅनडा (२००५)
दक्षिण आफ्रिका (२००६) नॉर्वे (२००८)
स्वीडन (२००९) अर्जेंटिना (२०१०)
आईसलँड (२०१०) पोर्तुगल (२०१०)
डेन्मार्क (२०१२) ब्राझील (२०१३)
उराग्वे (२०१३) न्यूझीलँड (२०१३)
फ्रान्स (२०१३) लक्झेंबर्ग (२०१४)
ग्रीनलँड (२०१५) फिनलँड (२०१५)
आर्यलँड (२०१५) अमेरिका (२०१५)
कोलंबिया (२०१६) ऑस्ट्रेलिया (२०१७)
जर्मनी (२०१७) भारत (२०१८)

समलैंगिक संबंधांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा असणारे देश १३ देश
सुदान इराण
सौदी अरेबिया येमेन
मॉरिटानिया अफगाणिस्तान
पाकिस्तान कतार
संयुक्त अरब अमिरिती नायजेरिया (काही प्रांतांमध्ये)
सोमालिया (काही प्रांतांमध्ये) सिरीया (काही प्रांतांमध्ये)
इराक (काही प्रांतांमध्ये)

समलैंगिक संबंध आणि त्यांच्या प्रचारावर बंदी असलेले देश १७ देश
अल्जेरिया इजिप्त
लिबिया मोरक्को
नायझेरिया सोमालिया
ट्यूनेशिया इराक
इराण जॉर्डन
कुवैत लेबेनॉन
कतार सौदी अरेबिया
सिरीया लुथानिया
रशिया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा